parth_pawar.jpg
parth_pawar.jpg 
पुणे

LokSabha 2019 : पार्थ पवार यांना द्यावी लागेल मावळमध्ये चुरशीची लढत

सकाळवृत्तसेवा

पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी जाहीर झाली. काही दिवसांपूर्वी कुटुंबातून किती लोकांना उमेदवारी द्यायची, असा प्रश्‍न पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच उपस्थित केला होता. मात्र, आज त्यांनी पार्थ हेच मावळमधून लढतील असे स्पष्ट केले.

आता सुप्रिया सुळे आणि पार्थ हे कुटुंबातील दोघे रिंगणात असतील. या उमेदवारीमुळे गेल्या काही महिन्यांपासून पार्थ या मतदारसंघात दौरे करत होते. आता त्यांना निवडून आणण्यासाठी अजित पवार यांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

पिंपरी आणि उरण हे विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत, तर चिंचवड आणि मावळ हे भाजपकडे आहेत. केवळ कर्जतचा अपवाद वगळता राष्ट्रवादीला इतर ठिकाणी घाम गाळावा लागणार आहे. सध्या मावळ हा मतदारसंघ युतीमध्ये सेनेकडे आहे. तो सेनेकडेच राहिल्यास पार्थ यांना लढत तुलनेने सोपी राहील. मात्र, पालघरच्या बदल्यात हा मतदारसंघ भाजपकडे आल्यास मात्र, पार्थ यांना निवडून येणे जड जाईल असा अंदाज आहे.

भाजपकडून आमदार लक्ष्मण जगताप इच्छुक आहेत. तसेच बारणे यांची उमेदवारी कायम राहिल्यास जगताप सेनेसाठी किती काम करतील याबाबत साशंकता आहे. त्यामुळे युतीत हा मतदारसंघ कोणाकडे जातो यावरही बरेच अवलंबून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT