पुणे

राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांना अटक आणि सुटका

सागर आव्हाड

पुणे, ता. 21 ः राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नुतन मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी कोरोनाच्या संसर्गाबाबतचे नियम पायदळी तुडवित मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सहा जणांना सोमवारी अटक करण्यात आली. दोन तासानंतर त्यांना जामीन मंजुर झाल्यानंतर त्यांची सुटका झाली.((NCP's Prashant Jagtap arrested)

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवक अध्यक्ष महेश हांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निकम, बाळासाहेब बोडके, सरचिटणीस रोहन पायगुडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संबंधीत सहा जणांसह 100 ते 150 जणांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रविवारी पोलिसांनी आदेश धुडकावणे (भादंवि 188 ), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, महाराष्ट्र कोविड उपाययोजना 2020 या कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिस कर्मचारी दिनेश वीर यांनी फिर्याद दिली होती.

शिवाजीनगर येथील डेंगळे पुलाजवळील धनश्री अपार्टमेंट येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नूतन मध्यवर्ती कार्यालय आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी या कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर इच्छुकांनीही यावेळी शक्तीप्रदर्शन केले होते. गर्दी झाल्यामुळे नाराजी व्यक्त करतानाच अजित पवार यांनी त्याबद्दल दिलगीरीही व्यक्त केली होती. "विकेंडला बाहेर जाणाऱ्या पुणेकरांना क्वारंटाईन करू' असे सांगणारे पवार हे या प्रकरणी कडक भुमिका घेणार का ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता.

दरम्यान, पुणे पोलिसांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत रविवारी शहराध्यक्ष जगताप यांच्यासह 100 ते 150 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी जगताप, हांडे, प्रदीप देशमुख, निलेश निकम, बाळासाहेब बोडके, रोहन पायगुडे यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. संबंधीत गुन्हा हा जामीनपात्र असल्याने पुढील दोन तासात त्यांचा जामीन झाला. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलीमा पवार यांनी दिली.

राष्ट्रवादीच्या पुणे शहर कार्यालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल होतं. दरम्यान, यावेळी गर्दी जमवल्याबद्दल अजित पवारांनी नाराजी दाखवत दिलगिरी व्यक्त केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT