Ajit pawar sakal
पुणे

Baramati News : बारामतीत राष्ट्रवादीचा घड्याळाचा उमेदवार तुमच्या मनातीलच असेल; अजित पवार यांची कार्यकर्त्यांना ग्वाही

बारामती व्यापारी महासंघ व मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने बारामतीत आयोजित मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

मिलिंद संगई

बारामती - आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघात घड्याळाच्या चिन्हावर लढणार उमेदवार हा तुमच्या मनातीलच असेल, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपणच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घड्याळ चिन्हावर उमेदवार असल्याचे अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले.

बारामती व्यापारी महासंघ व मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने बारामतीत आयोजित मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

अजित पवार यांनी भाषणामध्ये अनेकदा घड्याळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून उमेदवाराला विजयी करा असा उल्लेख केला. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी आपण आपली उमेदवारी जाहीर करा, असा आग्रह धरला. आम्हाला तुम्हीच उमेदवार म्हणून हवे आहात असे कार्यकर्त्यांनी नमूद केले.

कार्यकर्त्यांचा आग्रह पाहून अखेर अजित पवार म्हणाले की, बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळाचा उमेदवार तुमच्या मनातलाच असेल. यानंतर कार्यकर्त्यांनी एकच वादा अजित दादाच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.

गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार इतर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करणार, त्यांच्या ऐवजी इतर कोणीतरी उमेदवार असणार अशा प्रकारची चर्चा होती. या चर्चांना आज अखेर अजित पवार यांनीच एक प्रकारे पूर्णविराम दिला. ते बारामतीतूनच निवडणूक लढवणार हे अप्रत्यक्षरीत्या त्यांनी जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात कलाकारांच्या गुरुजनांना मानाचा मुजरा, गुरु-शिष्याची अनोखी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस

Mumbai News: ताडदेवस्थित वेलिंग्डन हाइट्सचे प्रकरण; तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार, कोर्टात काय घडलं?

LPG Booking: गॅस सिलेंडर बुकिंग नियमात आठवड्यात 3 वेळा बदल! गावाकडे आता किती दिवसांनी करता येणार बुकिंग?

Clerk Bribery Viral Video : निवृत्त महिलेकडून 45 हजारांची लाच घेताना बडा लिपिक कॅमेऱ्यात कैद; नोटा मोजतानाचा तोरा तर पाहा, आरोग्य विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT