एनडीए - १३६ व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनात हवाई दलातील लढाऊ विमान सुखोईने क्वार्टरडेकला मानवंदना करत आकाशात भरारी घेतली.
एनडीए - १३६ व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनात हवाई दलातील लढाऊ विमान सुखोईने क्वार्टरडेकला मानवंदना करत आकाशात भरारी घेतली. 
पुणे

रोमारोमांत संचारली राष्ट्रभक्ती

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’तील (एनडीए) खेतरपाल संचलन मैदानावर लष्कराच्या बॅंडच्या तालावर गुरुवारी सकाळी बरोबर पावणेसात वाजता कडक पांढऱ्या शुभ्र गणवेशात दमदार पावलांचा आवाज घुमू लागला. ही होती देशातील प्रत्येक नागरिकाच्या रोमारोमांत राष्ट्रभक्ती जागृत करणाऱ्या ‘एनडीए’च्या १३६व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनाची सुरवात...

लष्कराची करडी शिस्त व भावी अधिकाऱ्यांमधील दुर्दम्य आत्मविश्‍वासाचे दर्शन घडवीत देशाची सुरक्षा भविष्यात सक्षम हातांमध्ये सोपवत असल्याचा विश्‍वास या प्रत्येक क्षणाचे साक्षीदार असलेल्या प्रत्येक लष्करी अधिकाऱ्याने या वेळी व्यक्त केला. दीक्षांत संचलनाची मानवंदना हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी स्वीकारली. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी, ‘एनडीए’चे प्रमुख कमांडट एअर मार्शल आय. पी. विपिन, उपप्रमुख रिअर ॲडमिरल एस. के. ग्रेवाल आणि प्राचार्य ओमप्रकाश शुक्‍ला या वेळी उपस्थित होते. 

या तुकडीतून २९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात लष्कराचे २१८, नौदलाचे ३४ आणि हवाई दलाच्या ३९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच अफगाणिस्तान, भूतान, श्रीलंका, व्हिएतनाम, ताजिकिस्तान, मालदीव अशा मित्रराष्ट्रांमधील १५ विद्यार्थ्यांनीही ‘एनडीए’मधून खडतर लष्करी प्रशिक्षण घेतले. डिव्हिजनल कॅडेट कॅप्टन संदीप कोरंगा याने राष्ट्रपतींचे सुवर्णपदक पटकाविले. 

बटालियन कॅडेट ॲडज्युटंट दिव्यम द्विवेदी याने रौप्यपदक आणि बटालियन कॅडेट कॅप्टन शिवकुमारसिंह चौहान याने कांस्यपदक मिळविले.

‘एनडीए’तील खडतर प्रशिक्षणामध्ये प्रत्येक पावलावर स्वतःमधील क्षमतांची खूप जवळून जाणीव झाली. यात शारीरिक, मानसिक आव्हानाचा भाग मोठा होता. आव्हानांमुळेच स्वत:तील क्षमतांचा विकास करता आला. 
- संदीप कोरंगा, प्रेसिडेंट सुवर्णपदक विजेता

येथील प्रशिक्षण हे आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा काळ होता. माझ्या भावानेही ‘एनडीए’तून प्रशिक्षण घेतले आहे. तो १३२व्या तुकडीचा छात्र होता. तो आता नौदलात आहे. येथे येण्याची प्रेरणा मला त्याच्याकडून मिळाली.  
- दिव्यम द्विवेदी, रौप्यपदक विजेता 

वडील लष्करात सैनिक आहेत. त्यांच्या लष्करी शिस्तीने प्रभावित होऊनच मी ‘एनडीए’मध्ये आलो. मला माझे वडील सेवा करत असलेल्या राजपूत बटालियनमध्ये अधिकारी म्हणून रुजू होण्याची मनापासून इच्छा आहे. 
- एस. के. एस. चौहान, कांस्यपदक विजेता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT