पुणे

नागठाणे आगळी सहल

CD

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची ‘एनडीए’ला भेट

व्यक्तिमत्त्व विकासाला चालना; शिक्षण विभागातर्फे विशेष सहल

नागठाणे, ता. ४ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिक्षण विभागातर्फे एका विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले. त्यात सहभागी विद्यार्थ्यांना खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला (एनडीए) भेट देण्याची अपूर्व संधी लाभली.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान उपक्रमातून या अनोख्या सहलीचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची या सहलीसाठी निवड करण्यात आली. मुळात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या भेटीसाठी सहजासहजी परवानगी दिली जात नाही. मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी स्वतः पुढाकार घेऊन जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही नामी संधी मिळवून दिली. शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, उपशिक्षणाधिकारी गजानन आडे आदींच्या नियोजनाने ही सहल आयोजिली गेली. त्यातून विद्यार्थ्यांना तिन्ही सैन्य दलांसाठी अधिकारी घडविणाऱ्या ‘एनडीए’तील विद्यार्थ्यांचा दिनक्रम अनुभवता आला.
या सहलीत विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड येथील विज्ञान केंद्रालाही भेट दिली. त्यात विविध शैक्षणिक मॉडेल्स, प्रयोग सामग्री, अवकाश विज्ञान, ऊर्जा, ध्वनी, प्रकाश तसेच तंत्रज्ञानाविषयी माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक बाबींची प्रत्यक्ष अनुभूती घेतल्यामुळे त्यांच्या कितीतरी संकल्पना, संबोध स्पष्ट झाले. विज्ञान केंद्रातील तारांगण अन् विज्ञान पार्क हे विद्यार्थ्यांसाठी आकर्षण, कुतूहलाचा विषय ठरले.
सहलीत विद्यार्थ्यांना लाल महाल पाहण्याची संधी लाभली. त्यानिमित्ताने छत्रपती शिवरायांच्या देदीप्यमान कर्तृत्वाला, पराक्रमाला उजाळा मिळाला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक शनिवारवाड्याला भेट देऊन त्याची रचना, वास्तुकला यांची माहिती घेतली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी भेटीतून सहभागी विद्यार्थ्यांना शिक्षणातील आधुनिक प्रवाहाची माहिती मिळाली.

चौकट

सहलीतून काय साधले?
* ‘एनडीए’च्या विद्यार्थ्यांच्या दिनक्रमाचे प्रत्यक्ष दर्शन
* विज्ञान केंद्राच्या भेटीतून वैज्ञानिक संकल्पनांची माहिती
* ऐतिहासिक लालमहाल पाहून छत्रपतींच्या पराक्रमाचे स्मरण
* शनिवारवाड्याची रचना, वास्तुशैलीविषयी पाहणी
* आधुनिक, उच्च शिक्षण यांच्या स्पष्टता अधोरेखित

छायाचित्र ओळी
08231
सातारा : याशनी नागराजन यांच्यासोबत सहलीत सहभागी विद्यार्थी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

शाब्बास पठ्ठ्या... मॅच विनिंग खेळीचं संजू सॅसमनला मिळालं गिफ्ट, ICC ने केली मोठी घोषणा; अभिषेक शर्मासाठी धोक्याची घंटा

Horoscope : उद्या 5 मार्च! 'या' 5 राशीच्या लोकांसाठी 'महालक्ष्मी-धनलाभ योग'; होईल आर्थिक फायदा, नोकरी-धंद्यात काहीतरी मोठं घडणार

Latest Marathi News Live Update : धुळ्यात संताजी नगरात मध्यरात्री 5 दुचाकींना आग; संशयित आरोपी गजाआड

T20 WC, IND vs ENG: अभिषेक शर्माचा खराब फॉर्म, प्लेइंग-११ मधील जागेवर प्रश्नचिन्ह... भारताचे कोच काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT