hadapsar sakal
पुणे

औद्योगिक वसाहतीलगत कालव्यावर नागरिकांकडून झोपड्यांच्या अतिक्रमणाची तयारी

नागरिकांकडून झोपड्या उभारणीसाठी जागा पकडून झाडे झुडपे तोडण्याचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : येथील औद्योगिक वसाहतीलगत वाहत असलेल्या नव्या कालव्यावरील पाटबंधारे खात्याच्या जागेवर मोठ्याप्रमाणात नव्याने अतिक्रमण होऊ लागले आहे. सध्या येथे काही नागरिकांकडून झोपड्या उभारणीसाठी जागा पकडून झाडे झुडपे तोडण्याचे काम सुरू केले आहे. त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी हडपसर औद्योगिक असोसिएनने केली आहे.

हडपसर पोलिस वाहतूक शाखेच्या मागील बाजूने औद्योगिक वसाहतीला लागून कालव्याच्या कडेने मोठ्याप्रमाणात अतिक्रमण होत आहे. नागरिकांनी साड्या, दोऱ्या, लाकडे रोवून जागा पकडल्या आहेत. पकडलेल्या जागेवरील झाडेझुडपे त्यांच्याकडून तोडण्याचे व जमीन सपाटीकरणाचे काम सुरू आहे. शंभरच्यावर स्री-पूरूष हे काम करताना दिसत आहेत. महिन्यापूर्वी पाटबंधारे खात्याच्या येथील एका मोठ्या जागेवर अतिक्रमण झालेले आहे. कालपासून पुन्हा या अतिक्रमणाने जोर धरला आहे. औद्योगिक असोसिएनने याबाबत पाटबंधारे खाते व पालिकेकडेही तक्रार केली आहे.

यापूर्वी काही बेकायदा झोपड्या आणि छोट्या दुकानांचे येथे अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे परिसरात विविध समस्या सुरू झाल्या आहेत. अनेक नागरिक दारू पीत बसतात, जुगार खेळतात, चोरीच्या घटना घडत आहेत. औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना शिविगाळ व हल्लेही होत आहेत. मालमत्ता आणि वाहनांचे नुकसान होत आहे. उघड्यावर कचरा टाकून अस्वच्छता पसरवली जात आहे. अनेक वेळा कचरा जाळला जात आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सध्या होत असलेल्या अतिक्रमणाबाबत विचारायला गेल्यास तेथील जमावाकडून शिविगाळ, दगडफेक व धक्काबुक्की केली जात असल्याचे असोसिएनकडून सांगण्यात आले आहे.

"या अतिक्रमणाबाबत औद्योगिक असोसिएनने तक्रार केली आहे. संबंधीत ठिकाणी पाहणी करून सविस्तर माहिती घेतली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली आहे. त्यांच्याकडून पाहणी केली जाणार आहे."

-विनायक जांभवलीकर, मुकादम, पाटबंधारे विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

खोटं बोलून नदी किनारी नेलं; नंतर जावयानं सासूला क्रूरपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Velhe Nasrapur Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजगड तालुक्यात तीव्र पडसाद; वेल्हे-पानशेतसह परिसर कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT