पुणे

सर्व आवृत्तींसाठी : ‘नीट’ पेपरफुटीचे नाशिक ‘कनेक्शन’

CD

नाशिकमध्ये तरुणास
पेपरफुटीप्रकरणी बेड्या

सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : ‘नीट’च्या पेपरफुटीप्रकरणात नाशिकमध्ये बीएएमएसच्या विद्यार्थ्याला अटक केली असून, त्याने एक दिवस आधी पेपर फोडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी अहिल्यानगरमधील असून, त्याचा शोध सुरू आहे.
शुभम मधुकर खैरनार (वय २७) असे आरोपीचे नाव असून, इंदिरानगर परिसरातून मंगळवारी (ता. १२) सकाळी अटक करण्यात आली आहे. त्याला सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तर धनंजय लोखंडे (रा. अहिल्यानगर) असे दुसऱ्या आरोपीचे नाव असून, त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.

....
ओळख लपविण्याचा प्रयत्न
‘नीट’चा पेपर नाशिकमधून फुटल्याची माहिती मिळताच शुभम खैरनारचा यात सहभाग असल्याची माहिती राजस्थान पोलिसांनी नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने शुभमचा माग काढला. तो मंदिर दर्शनासाठी जात होता. त्याने ओळख लपविण्यासाठी केस वाढविले होते. पोलिसांच्या पथकाने त्याला घेरले आणि त्याची ओळख पटवून ताब्यात घेतले.
.....
१५ लाखांना पेपरची विक्री
प्राथमिक तपासात, शुभम खैरनार याने दोन मे रोजी १० लाख रुपयांना ‘नीट’चा पेपर खरेदी केला होता. त्याच पेपरची त्याने १५ लाख रुपयांना विक्री केल्याचे समजते. ज्या पाकिटात नीटची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका आली, तेच पाकिट त्याने दिल्ली वा हरियानाला पाठविले होते. त्यानंतर तोच पेपर उत्तरपत्रिकेसह इन्स्ट्राग्राम या सोशल मीडियावर व्हायरल झाला.
.....
आरोपी समुपदेशन करायचा
संशयित शुभम खैरनार हा बीएएमएसच्या शेवटच्या वर्षांचे शिक्षण घेत असून, विवाहित आहे. तो ‘एसजी कौन्सिलिंग’च्या माध्यमातून ‘नीट’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करायचा. त्याचे वडील मधुकर खैरनार हे नांदगाव (जि. नाशिक) येथे डॉक्टर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गंगोत्री-गोमुख ट्रेकवेळी भूस्खलन, महाराष्ट्रातील व्यापाऱ्याचा दरीत पडून बेपत्ता

Pakistan Terrorism : दहशतवादाच्या विळख्यात पाकिस्तान; ग्लोबल टेररिझम इंडेक्समध्ये अव्वल

'मराठीत बोल नाहीतर यूपीला परत जा', मुंबई लोकलमध्ये भाषेवरून महिला प्रवाशांमध्ये वाद पेटला; Video Viral

SA vs AUS 2nd ODI: कूपर कॉनोलीची 'Stunning Catch'! एडन मार्करमचा सुरेख फटका अन् ऑसीची परफेक्ट टायमिंग Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT