curfew
curfew 
पुणे

Coronavirus : गरजा झाल्या सिमीत

संगीता कांबळे

पिंपरी - संचारबंदीच्या काळात पिंपरी चिंचवड शहरातील अनेक गृहिणींना आपल्या गरजा लक्षात आल्या आहेत. अनेकींनी आपली पूर्वीची जीवनशैली अवलंबली असून गरजा सिमीत झाल्याचे सांगितले.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेकांनी घरात जीवनावश्यक वस्तूचा साठा केला.  मात्र, हा साठा किती काळ टिकवायचा याचा अजून काही अंदाज नसल्याने गृहिणीनी आपल्या जीवनशैलीत बदल करत  घरातील वस्तू जपून वापरण्यास सुरुवात केली आहे. 

या विषयी प्रतिभा म्हणाली, ''घरातील विविध साहित्य वापरून नवनवीन पदार्थ बनविते. बाहेरचे खाणे पूर्ण बंद झाले आहे. घरात सर्वजण असल्याने एकत्र नास्ता, जेवण होते. तसेच साहित्य जपून वापरायचे असल्याने जास्त प्रमाणात स्वयंपाक बनवत नाही. त्यामुळे अन्न वाया जात नाही. गरजाही सिमीत झाल्या.''

दीपाली म्हणाली, ''नोकरी करत असल्याने खूप वेळ घरात मिळत नव्हता. मात्र, आता घरी असल्याने खर्च कमी झाल्याचे दिसते. अनावश्यक खरेदी बंद झाली.''

अर्चना म्हणाली, ''आठ एक दिवसांपूर्वी हात ढिला सोडून स्वयंपाक करत होते. आता हवे तेवढे रुचकर जेवण बनविते.''

स्वाती म्हणाली, ''घरी असल्याने गरजा कमी झाल्या. कमी वस्तू आणि साहित्याचा वापर करून चांगले राहता येते हे लक्षात आले. साठेबाजी न करता हवे तेवढेच आणते. त्यामुळे अनावश्यक खर्च बद झाला.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT