Dr Vijay Kumar Saraswat 
पुणे

शहरांमध्ये 'इनोव्हेशन सेंटर' उभारा; निती आयोगाचे सदस्य डॉ. सारस्वत

सकाळवृत्तसेवा

पुणे : ''देशाची अर्थव्यवस्था अधिकाधिक सुदृढ करण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनांच्या (इनोव्हेशन) अंमलबजावणीवर भर द्यायला हवा. त्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनांना चालना मिळेल अशा पद्धतीने अभ्यासक्रमात बदल होणे ही काळाची गरज आहे. तसेच स्थानिक प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रत्येक 'स्मार्ट सिटी'मध्ये इनोव्हेशन सेंटर उभारण्यात यावे,'' असा सल्ला निती आयोगाचे सदस्य डॉ. विजयकुमार सारस्वत यांनी दिला. 

कौन्सिल ऑफ सायंटिफिक ऍण्ड इंडस्ट्रिअल रिसर्च(सीएसआयआर)च्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. सारस्वत यांचे 'स्ट्रॅटेजी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया इन टू ऍन इनोव्हेशन सोसायटी' विषयावर व्याख्यान झाले. या वेळी सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) संचालक प्रा. अश्‍विनी कुमार नांगिया उपस्थित होते. 

डॉ. सारस्वत म्हणाले, ''देशाच्या दरडोई उत्पन्नात होणाऱ्या वाढीमध्ये सेवाक्षेत्राचा मोठा वाटा असून सेवाक्षेत्रात मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन होत आहेत. उत्पादन, व्यापार, तंत्रज्ञान या क्षेत्रात नावीन्यतेला वाव आहे. तंत्रज्ञानात काळानुरूप बदल होत असून तंत्रज्ञानाच्या आधारे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना प्रभावीपणे राबविता येतील. परंतु पुरेसे ज्ञान, आर्थिक गुंतवणूक, भांडवल, नेतृत्व कौशल्य, तंत्रज्ञान, संशोधन आणि विकास याचा अभाव असल्यामुळे इनोव्हेशनला म्हणावी तितकी चालना मिळत नसल्याचे चित्र आहे,'' असे मत डॉ. सारस्वत यांनी व्यक्त केले. 

''डिजिटलकडे वाटचाल करताना सायबर सिक्‍युरिटीमध्ये अधिकाधिक नावीन्यतेला वाव आहे. नेटवर्क सिक्‍युरिटी, मालवेअर प्रीव्हेंशन, डिजिटलचा वापर करणाऱ्यांमध्ये जनजागृती करणे, डिजिटल साक्षरता वाढविणे यासाठी 'इनोव्हेशन' आवश्‍यक आहे. तसेच स्थानिक प्रश्‍न सोडविण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने इनोव्हेशन सेंटरची उभारणी करता येईल, त्यातून स्थानिक प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेणे शक्‍य होईल,'' असेही डॉ. सारस्वत यांनी सुचविले. कार्यक्रमात डॉ. नांगिया यांनी प्रास्ताविक केले. 

'इनोव्हेशन इको सिस्टिम'बाबत डॉ. सारस्वत यांनी दिलेला सल्ला : 

  • 'इनोव्हेशन'बाबत हवे राष्ट्रीय धोरण. 
  • संशोधन आणि विकास कामातील गुंतवणूक वाढावी. 
  • प्रत्येक जिल्हा स्तरावर हवे इनोव्हेशन सेंटर. 
  • प्रत्येक स्मार्ट सिटीत 'इनोव्हेशन सेंटर'द्वारे विकास साध्य करणे शक्‍य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Retirement News: "होय, हा माझा शेवटचा वर्ल्ड कप होता, पण..."; रोनाल्डोची निवृत्तीबाबत मोठी घोषणा; म्हणाला, मी माझे सर्वस्व दिले...

SET Date Change: एमपीएससी परीक्षा व आषाढी वारीमुळे राज्यस्तरीय सेट परीक्षा २६ जुलैऐवजी ६ सप्टेंबरला; विद्यार्थ्यांच्या मागणीला विद्यापीठाची मान्यता

Latest Marathi News Update : संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू

Abhishek Sharma: AI व्हिडिओंमुळे अभिषेक शर्माची कोर्टात धाव; 'माझ्या नावाचा गैरवापर थांबवा', दिल्ली हायकोर्टात याचिका

राजभवनातील SRPF जवानाच्या मृत्यूला नवं वळण! महिला कॉन्स्टेबलशी वाद; प्रेमसंबंधाचे फोटो पतीला पाठवले नंतर... धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT