CYBER CRIME SAKAL
पुणे

सायबर हल्ल्यांवर मात करण्यासाठी सक्षम होण्याची गरज : डॉ. राव

सायबर युद्धावर मात करण्यासाठी अधिकाधिक सक्षम होण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘आजच्या डिजिटल युगात माहितीचे (डेटा) आदान-प्रदान करताना ती चोरला जाण्याची भीती आहे. त्यामुळे या काळात सायबर सुरक्षिततेला अधिक महत्त्व आहे. सायबर युद्ध हे अन्य नियमित युद्धापेक्षा असुरक्षित आहे. सायबर हल्ल्यांवर, सायबर युद्धावर मात करण्यासाठी अधिकाधिक सक्षम होण्याची गरज आहे. त्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ‘सायबर युद्धाला सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज आहोत का?’ याचा विचार करत तरुणांनी अधिकाधिक चांगले उपाय घेऊन पुढे यावे,’’ असे मत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापनाचे संचालक डॉ. व्ही. व्ही. राव यांनी व्यक्त केले.

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) वतीने आयोजित ‘माईंड स्पार्क’ या तंत्रज्ञान महोत्सवाची सांगता डॉ. राव यांच्या उपस्थितीत रविवारी झाली. या वेळी सीओईपीचे संचालक डॉ. बी. बी. अहुजा, अधिष्ठाता डॉ. पी. आर. धामणगावकर, महोत्सवाच्या प्राध्यापक सल्लागार डॉ. आरती पेटकर, महोत्सवाचे सचिव रोहन पिसीपती उपस्थित होते.

डॉ. राव म्हणाले, ‘‘आगामी काळात जैविक, सायबर आणि अवकाश युद्धाला सामोरे जाण्यासाठी आतापासून सक्षम उपाययोजनांवर भर द्यावा लागेल. त्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, कॉग्निझंट तंत्रज्ञान, सिम्युलेशन तंत्रज्ञान आणि स्मार्ट मटेरिअल यामध्ये अधिक काम करावे लागणार आहे. त्याशिवाय स्वदेशी बनावटीचे शस्त्रास्त्रे निर्मितीबरोबरच विविध तंत्रज्ञान निर्मितीमध्ये संशोधन आणि विकासात्मक कामाला वाव आहे. त्यामुळे तरुणांनी ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करायला हवी.’’ डॉ. राव यांनी ‘डीआरडीओ’च्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.

समाजातील प्रश्न सोडविण्याबरोबरच उद्योग क्षेत्रांतील मागणी आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन त्यावर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असा सल्ला डॉ. अहुजा यांनी दिला. डॉ. धामणगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. रोहन पिसीपती यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Statement : 'मतदार संघात जाऊन बेईमान खासदारांना धडा शिकवणार, उद्धव ठाकरे-पवारांशी चर्चा'; संजय राऊत संतापले

Solapur Politics: भाजपच्या मतदारांवर आमदार-पदाधिकाऱ्यांचा वॉच; नगरसेवक सकाळी आठला ‘हेरिटेज’मध्ये जमणार, ११च्या आत मतदान करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : भाजप नगरसेवकांची एकजूट कायम ठेवण्यासाठी बावनकुळे यांची बैठक

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात 'मे' चा हप्ता जमा, पण 'या' दीड लाख महिला राहणार वंचित; नेमकं काय घडलं?

Pune Shirdi Express: साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुणे-शिर्डी दररोज धावणार नवी एक्स्प्रेस; रेल्वे दौंड, अहिल्यानगर, राहुरीमार्गे

SCROLL FOR NEXT