Ajit pawar sakal
पुणे

Ajit Pawar : अल्पवयीन मुलांच्या वयात बदल करण्याची गरज

गेल्या काही दिवसात पुणे व बारामती परिसरात घडलेल्या विविध गुन्हेगारी घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश ही चिंताजनक बाब आहे.

मिलिंद संगई,

बारामती - गेल्या काही दिवसात पुणे व बारामती परिसरात घडलेल्या विविध गुन्हेगारी घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश ही चिंताजनक बाब आहे. कायद्यामध्ये अल्पवयीन या निकषाची व्याख्या बदलून वय मुलांसाठी 14 तर मुलींसाठी 12 वर्षे करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची चर्चा करू, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

बारामतीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, बारामतीत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी मधला वाढता सहभाग, ही बाब सामाजिक दृष्ट्या चिंताजनक आहे.

या संदर्भात यापूर्वी देखील कायद्यामध्ये अल्पवयीन वयाची जी मर्यादा आहे ती कमी करून मुलींसाठी 12 तर मुलांसाठी 14 करण्याबाबत आता निर्णय घ्यावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

कायदा करताना त्यासाठी केंद्र सरकारशी विचारविनिमय करावा लागतो.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत आगामी काळात होणाऱ्या चर्चेमध्ये मी याबाबत त्यांच्याशी बोलणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. अनेक घटनांमध्ये अल्पवयीन असल्याने कितीही गंभीर गुन्हा झाला तरी त्याला कायद्याने फार काही करता येत नाही, ही त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने आता पावले उचलण्याची गरज अजित पवार यांनी बोलून दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT