Rohit Pawar Sakal
पुणे

विकासासाठी जातींचे राजकारण मागे टाकण्‍याची गरज - आमदार रोहित पवार

आज जातीपातीचे राजकारण सोडून विकासाचे समाजकारण करणे आवश्यक आहे. विकासाचा वेग वाढवायचा असेल, तर जातींच्या शृंखला गळून पडल्या पाहिजे.

प्रशांत पाटील

आज जातीपातीचे राजकारण सोडून विकासाचे समाजकारण करणे आवश्यक आहे. विकासाचा वेग वाढवायचा असेल, तर जातींच्या शृंखला गळून पडल्या पाहिजे.

पुणे - आज जातीपातीचे राजकारण (Caste Politics) सोडून विकासाचे (Development) समाजकारण (Sociology) करणे आवश्यक आहे. विकासाचा वेग वाढवायचा असेल, तर जातींच्या शृंखला गळून पडल्या पाहिजे. थोरामोठ्यांच्या केवळ जयंती आणि पुण्यतिथी साजरी करून भागणार नसून त्यांनी सांगितलेले विचार आत्मसात करून त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी नुकतेच केले.

महामाता रमामाई भिमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातर्फे यंदाचा रमाई रत्न पुरस्कार आमदार रोहित पवार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विजयमाला कदम यांना आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष सचिन ईटकर, मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, लता राजगुरू, कुणाल राजगुरू, प्रेरणा गायकवाड, बौद्ध धर्माचे अभ्यासक झेन मास्टर सुदस्सन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षा विद्या कदम, कार्याध्यक्ष फरझाना इकबाल आदी उपस्थित होते.

भारत सासणे म्हणाले, ‘आज विभक्त कुटुंब पद्धती आपण स्वीकारली असली तरी कुटुंब व्यवस्था आजही भारतात टिकून आहे. त्या कुटुंब व्यवस्थेचा स्त्री हा कणा आहे. त्या अर्थाने भारतीय कुटुंब व्यवस्थेतील प्रत्येक स्त्रीमध्ये रमामाईचा अंश आहे’. तर ‘समाज उत्थानाचा आणि समाजाप्रती असलेल्या आमच्या दायित्वाचा वसा स्व. पतंगराव कदम यांनी संपूर्ण कदम कुटुंबियांना दिलेला आहे. तो वसा आम्ही निष्ठेने जोपासू. आज मिळालेला पुरस्कार आम्हाला उभारी आणि प्रेरणा देणारा असून कर्तव्याची जाणीव करून देणारा आहे’, असे मत विजयमाला कदम यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक अॅड. प्रमोद आडकर यांनी केले. विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. तर लता राजगुरू यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT