पुणे

पुरंदरला 7000 जण जेवतात मदतीच्या घासातून...

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (पुणे) : कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत काळजी म्हणून पुरंदर तालुक्यात 63 हजार 900 कुटुंबांपर्यंत आशा वर्करांनी पोचून सर्वेक्षण आतापर्यंत पूर्ण केले आहे. तर सुमारे 7 हजार गरीब व गरजूंना रोजच्या जेवणाची व 9,425 गरजू कुटुंबांना महिन्याचे जीवनावश्यक किट्स वाटप झाले आहे, अशी माहिती तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी आज दिली. 

तहसीलच्या आवाहनानुसार...

किट्स व अन्न वाटपात व शिक्षक संघ, होप व येवले फौंडेशन, ग्रामीण संस्था, विविध देवस्थाने, ज्युब्लिएंट, झेंडे फौंडेशन आदी संस्था व दानशूरांचा समावेश आहे. मास्क, सॅनेटायझर वाटप व निर्जंतुकीकरण कमानीतही अनेकांचा हातभार आहे; असे पत्रकार परिषदेत तहसीलदार सरनौबत यांनी स्पष्ट केले.

परदेश प्रवास करुन आलेल्या पुरंदर तालुक्यातील 58 जणांचे 14 दिवसांसाठीचे राहत्या घरीच विलगीकरण (होम क्वारंटाइन) यापूर्वीच संपले. तरी मधल्या  काळात कित्येक गावात बाहेर गावचे लोक आले; ही बाब गांभीर्याने घेत त्यांची ग्रामपंचायत व पोलीस पाटलांनी नोंद करुन ते होम क्वारंटाइनमध्ये राहतील, असे आदेश दिल्याचेही सांगितले. ते फिरताना दिसल्यास तक्रार करावी. त्यांच्यावर कारवाई होईल.

आतापर्यंत आढळून आलेले 15 संशयितांची वेळोवेळी पुण्याला पाठवणी केली. हे सारे तपासणीत निगेटिव्ह ठरले. त्यामुळे अजूनही तालुका संसर्गापासून सुरक्षित आहे. पुणे जवळ आहे, लोक शिस्त पाळत नाहीत. संचारबंदीत ढिलाई झाल्याचे दिसते. यावर नियंत्रण नाहीत आल्यास कडक कारवाईचे व बंधनांचे पुढचे पाऊल उचलले जाईल; असेही तहसीलदारांनी कडक शब्दात जनतेला बजावले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

SCROLL FOR NEXT