Neelam Gorhe Criticized Chandrakant Patil Pune 
पुणे

''चंद्रकांत पाटलांनी पुन्हा कोल्हापूरला येऊन दाखवावं''

सकाळवृत्तसेवा

पुणे : 'पुण्याच्या नामकरणाचा विषय मुळात वादाचा नाही. नवीन इतिहास घडविणे जगजाहीर आहे. संभाजीनगर हा प्रस्ताव आधीच ठेवला आहे. उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील. काही लोक यामध्ये तेढ वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पुणेकरांनी विद्यापीठाचे नामांतर आनंदाने स्वीकारलं आहे. उपसभापती या नात्याने माझं मत मांडणार नाही. जिजामातांचे नाव पुण्याला देण्याची मागणी आहे. त्याबाबत सरकार विचार करेल. नामांतराच्या बाबतीत सरकार कटिबद्ध आहे'' अशी भूमिका विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. 

औरंगाबादच्या नामकरणाची चर्चा सुरु असताना आता पुण्याचे नामकरण करण्याची मागणी भाजपने केली आहे.त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधीपक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान येत्या महापालिकेच्या निवडणूका औरंगाबादच्या नामकरणच्या मुद्यावरच गाजण्याची शक्यता वतर्वली जात आहे. यावरुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर नाटक कंपनी म्हणत टीका केली होती. त्याला शिवसेनेकडून आज प्रत्यूतर देताना, गोऱ्हे म्हणाल्या, ''विरोधीपक्षांच्या नेत्यांची भूमिका चांगली आहे. आम्ही नाटक कंपनी असलो तरी ते प्रेक्षक म्हणून चांगलं काम करत आहेत. आमच्या भूमिकेवर शंका घेण्याची आवश्यकता नाही. त्यांना धक्का बसला आहे. मी परत येईन ऐवजी आता त्यांनी मी परत जाईनचा विचार करावा. चंद्रकांत पाटलांना पण आव्हान आहे त्यांनी पुन्हा कोल्हापूरला येऊन दाखवावे.'' 

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा  

आज मीनाताई ठाकरे यांची जयंती निमित्त पुण्यातील निवासस्थानी नीलम गोऱ्हे यांच्याकडून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. ''बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्या संस्काराने शिवसेना उभी राहिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने खूप ठिकाणी काम केलं. 2020-2030 हे कृती दशक असल्याचे संयुक्त राष्ट्रांने जाहीर केलं. त्यानुसार आज संकल्प करतेय की, महिलांसाठी शक्ती कायदा आणण्यासाठी काम करणार'' अशी माहिती देखील गोऱ्हे यांनी यावेळी दिली. 

पुण्यात काही दिवसांपुर्वी गवे शिरले होते. दरम्यान, यावेळी लोकांच्या अतिउत्साहामुळे एका गव्याचा मृत्यू देखील झाला होता. पण अचानक गव्यांचे शहरात प्रवेश झाल्यामुळे अनेक प्रश्न उभे राहीले आहेत. याबाबत गोऱ्हे यांना विचारले असता त्या म्हणाल्या,''कोणीतरी गवे पाळले असतील? ते कोणी सोडले हे बघायला हवं. लोकांचं वागणं बरोबर नाही, गव्यांच्या बाबत विचार व्हायला हवा अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT