Neelam Gorhe demand to investigation of the government lawyers in case of pune porsche accident Sakal
पुणे

Neelam Gorhe : सरकारी वकिलांच्या चौकशीची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

अपघातातील आरोपी १७ वर्षे आठ महिन्यांचा असल्याने त्याला बाल हक्क न्याय मंडळासमोर हजर केले होते.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला तत्काळ जामीन कसा मिळाला? या बाबत संबंधित सरकारी वकील आणि जिल्हा सरकारी वकील यांची चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अपघातातील आरोपी १७ वर्षे आठ महिन्यांचा असल्याने त्याला बाल हक्क न्याय मंडळासमोर हजर केले होते. त्यावेळी सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी जामिनाला विरोध करणे अपेक्षित होते. परंतु त्यांच्या भूमिकेमुळे आरोपीला जामीन मिळाला.

त्यामुळे त्यांची व जिल्हा सरकारी वकिलांचीही चौकशी होणे गरजेचे आहे. बाल हक्क न्याय मंडळातील नियुक्त्या, तेथील कामकाजाबाबत सक्षमीकरण व कार्यप्रणालीचे प्रमाणीकरण (एसओपी) होणे गरजेचे आहे.

लोकसंख्या वाढत असल्याने गुन्ह्यांमधील अल्पवयीनांचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत अल्पवयीनांना पुढे करून अनेकदा गुन्हेगारी टोळ्या गैरफायदा घेतात. काही वेळा अल्पवयीन गुन्हेगारांकडून अजाणतेपणी गुन्हा होतो, या बाबीही लक्षात घेणे गरजेचे आहे. अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये सुधारणा करण्यासाठीच्या कोणत्या शिक्षांमुळे त्यांच्यात खरोखरच सुधारणा होऊ शकते का? याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

काही वेळा असे अल्पवयीन आरोपी बालकल्याण संस्थेचे नियम न पाळता , सरळ गायब होतात, याबाबत दाद-फिर्याद घेतली जात नाही. त्यातही दक्षतेने पोलिस व न्याययंत्रणेकडून संनियंत्रण अधिक आवश्यक आहे, असे गोऱ्हे यांनी म्हटले आहे. याबाबत आगामी अधिवेशनात काही पावले उचलली जावीत, यासाठी बालकल्याण संस्था व संबंधित विभागांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: २ कोटींची सुपारी, आरोपींसोबत धनंजय मुंडेंचा संवाद...; मनोज जरांगेंनी थेट पुराव्याच्या ऑडिओ क्लिप ऐकवल्या

Thane News: 27 गावं तरी स्वतंत्र नगर परिषद नाही, आमदार-खासदार आक्रमक; कल्याण शीळ रोडवर सर्वपक्षीय आंदोलन

Dhananjay Munde: राज्यातल्या बड्या नेत्यांच्या गाड्यांमध्ये धनंजय मुंडेंनी मोबाईल लपवले? आरोपांवर स्वतःच दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : जकार्तामधील मशिदीत स्फोट; 50 हुन अधिकजण जखमी

Mosque Blast : 'जुमे की नमाज' सुरू असतानाच मशिदीत भीषण स्फोट; ५० पेक्षा अधिकजण जखमी

SCROLL FOR NEXT