neelam gorhe says pramod bhangire not disappointed politics Sakal
पुणे

Neelam Gorhe : शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे नाराज नाहीत; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे स्पष्टीकरण

‘‘शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे पक्षात नाराज नाहीत. त्यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे पक्षात नाराज नाहीत. त्यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. विरोधकांकडून जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत,’’ असे शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, स्वत: शहराध्यक्ष भानगिरे यांनीही आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात जाहीर सभा नुकतीच पार पडली. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या सभेनंतर शिंदे हे भानगिरे यांच्या घरी जेवणासाठी जाणार होते.

त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारीही केली होती. परंतु शिंदे यांनी घरी जाणे टाळले. त्यामुळे भानगिरे आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. शहराध्यक्ष भानगिरे यांचा फोन दिवसभर बंद होता. या संदर्भात भानगिरे यांच्याशी रात्री संपर्क साधला असता त्यांनी आपण नाराज नाही. विरोधकांच्या अफवांना आपण महिला मेळाव्यात उत्तर देऊ, असे सांगितले.

हडपसरमध्ये आज महिला मेळावा

जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी हडपसरमधील हांडेवाडी रस्त्यावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानावर शुक्रवारी (ता.३) सायंकाळी सहा वाजता महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, महिलांचे विविध प्रश्न तसेच महिलांचा राजकीय व सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्यास शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, जिल्ह्यातील सर्व महिला संपर्कप्रमुख, जिल्हा संघटिका उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

SCROLL FOR NEXT