neelam-gorhe 
पुणे

"उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियतेमध्ये शरद पवार यांचा वाटा" - गोऱ्हे

ओमकार वाबळे

राज्याचा मूड काय आहे या अहवालातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्यातून मिळालेल्या आकडेवारीतून वेगवेगळ्या गोष्टी पुढे आल्या आहेत. यावर शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी मत व्यक्त केलं. 2013 पासून अनेक सर्वेक्षणं झाली. 2014 जेव्हा स्थलांतराचा सकाळचा कौल झाला तेव्हा त्यातून अनेक गोष्टी घडल्या. तर आनंदी आनंद जरुर आहे. दोन वर्षे पूर्ण होताना ठाकरे सरकारला आणखी मोठी झेप घेण्याची गरज वाटते, असं शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे म्हणाल्या.

राज्यात महाविकास आघाडीला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. दोन वर्षात महाविकास आघाडीला कोणकोणत्या बाबतीत यश आलं, राज्य सरकारच्या कोणत्या निर्णयांचं नागरिकांनी स्वागत केलं, कोणते निर्णय सरकारची प्रतिमा डागाळत आहेत, याचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये शिवसेना आणि ठाकरे सरकारबद्दल महत्वाची निरीक्षणं नोंदवण्यात आली.

भाजपची सत्ता आहे. त्यांनी सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे दाखवून दिलं आहे. त्यांनी अनेकांना वेसण घालण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे काय झाले हे दिसून आले आहे. त्यांनी साम दाम दंड भेद करुन त्यांनी सत्तेसाठी प्रयत्न केले. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आमचे काम मजबूत आहे, असं त्या म्हणाल्या. मात्र,विरोधकांना कमी लेखून चालणार नाही, हे त्यांनी अधोरेखित केलं.

काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?

काँग्रेस जेव्हा मविआमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी अतिशय विचारपूर्वक भूमिका घेतली. त्यांनी यावेळी इतर पक्षांना पुढाकार देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचा मुद्दाच वेगळा आहे. एका मुख्यमंत्री पदासाठी सगळं काही विस्कटतं. सर्वेक्षणामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहे. व्यक्ती म्हणून काही गोष्टी त्यात मांडण्यात आल्या आहेत.

देवेंद्रजी पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांची लोकप्रियता आहे. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री ही भूमिका आहे. उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियतेमध्ये शरद पवार यांचाही सहभाग आहे. राजकारण अधिक खुलं होईल तसं उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता आणखी वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला गेला! Mumbai Indians स्टारने इतिहास रचला, जगातील पहिला असा संघ ज्याने...

'या' राशीच्या महिलांपासून चार हात लांबच राहा! इतक्या भांदकुदळ असतात की...

का झाला हृतिक रोशन- सुझान खानचा घटस्फोट? भाऊ जायेदने सांगितलं कारण, म्हणाला- हृतिकची गर्लफ्रेंड

८० लाख पॅकेजची नोकरी AIमुळे गेली, IT इंजिनिअर पतीने आयुष्य संपवलं; शेवटची चिठ्ठी वाचून पत्नीनेही १८व्या मजल्यावरून मारली उडी

Kurla Accident: कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट, आरोपी बेस्ट बसचालकला अखेर जामीन; हायकोर्टाचा निर्णय

SCROLL FOR NEXT