पुणे

नीट - अजून एक मास्टरमाइंड अटकेत

CD

‘नीट’ प्रक्रियेला
तज्ज्ञांचीच वाळवी

''एनटीए''ने नेमलेल्या पुण्यातील महिला शिक्षिकेला अटक

पुणे/नवी दिल्ली, ता. १६ : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातील महिला शिक्षिकेला अटक केली आहे. ही महिला शिक्षिका प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत तज्ज्ञ म्हणून सहभागी झाली होती आणि यापूर्वी अटक झालेली ब्युटी पार्लर व्यावसायिक मनीषा वाघमारेच्या माध्यमातून तिने विद्यार्थ्यांना एकत्र करून विशेष शिकवणी वर्ग घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
मनीषा गुरुनाथ मांढरे असे अटक केलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. पांढरे ही येथील एका नामांकित महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विभागात शिक्षिका आहे. तिला चौकशीसाठी दिल्लीत बोलावले होते. त्यानंतर चौकशीतून समोर आलेल्या तपासाच्या आधारे तिला अटक केली आहे. शिकवणी वर्गात शिकविलेले अनेक प्रश्‍न प्रत्यक्ष ‘नीट’च्या प्रश्‍नपत्रिकेशी जुळल्याचे ‘सीबीआय’ने स्पष्ट केले आहे.
‘सीबीआय’ने केलेल्या चौकशीनुसार, राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून (एनटीए) मांढरे हिची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. तिला वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र विषयांच्या प्रश्‍नपत्रिकांची माहिती होती. एप्रिमध्ये तिने वाघमारे हिच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांना संपर्क साधून पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी विशेष शिकवणी वर्ग घेतले होते. त्यात तिने वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र विषयांतील प्रश्‍न विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. ते प्रश्‍न वहीत लिहून घेण्यास आणि पाठ्यपुस्तकांमध्ये खुणा करण्यास सांगितल्याचेही तपासात उघड झाले आहे. यातील बहुतांश प्रश्‍न तीन मे रोजी झालेल्या ‘नीट’च्या प्रत्यक्ष प्रश्‍नपत्रिकेशी जुळल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात यापूर्वी पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ब्युटी पार्लर चालविणाऱ्या मनीषा वाघमारे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील धनंजय लोखंडे यांना अटक केली होती. लोखंडेच्या संपर्कातून ‘पुणे कनेक्शन’ समोर आल्यानंतर ‘सीबीआय’ने तपासाची सूत्रे वेगाने हलविली होती. पुण्यातील अभियांत्रिकी शाखेतील एका विद्यार्थ्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीनंतर त्याला सोडून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सहा ठिकाणी शोधमोहीम
गेल्या २४ तासांत ‘सीबीआय’ने देशभरातील सहा ठिकाणी शोधमोहीम राबवून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त साहित्याचे सविस्तर विश्‍लेषण सुरू असल्याचे ‘सीबीआय’ने सांगितले.

आतापर्यंत नऊ जणांना अटक
या गुन्ह्यात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून एकूण नऊ आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी पाच आरोपींना न्यायालयात हजर केले असून, सखोल चौकशीसाठी सात दिवसांची ‘सीबीआय’ कोठडी सुनावली आहे. गुरुवारी अटक केलेल्या दोन आरोपींना पुणे न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेतली असून, त्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी दिल्लीला हजर केले आहे.

निवृत्तीच्या उंबरठ्यावर कारवाई
मांढरे ही गेल्या २४ वर्षांपासून वनस्पतीशास्त्र विषयाचे अध्यापन करत आहे. त्या पुढील आठ ते दहा महिन्यांत सेवानिवृत्त होणार होत्या. मात्र, त्यापूर्वीच ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणातील त्यांच्या कथित सहभागाचा उलगडा झाल्याने त्या ‘सीबीआय’च्या कचाट्यात सापडल्या आहेत.
…

‘नीट’ रद्द करण्याची मागणी
बंगळूर : केंद्र सरकारने पुढील वर्षीपासून वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’ रद्द करावी आणि राज्यांना पारदर्शक व गुणवत्तेवर आधारित प्रवेश परीक्षा घेण्याचे अधिकार द्यावेत, अशी मागणी कर्नाटक सरकारने शनिवारी केली. कर्नाटकचे शिक्षणमंत्री शरणप्रकाश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे.

....
देशातील २२ लाख विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी एकही शब्द बोललेले नाहीत. त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तत्काळ पदावरून काढून टाकावे किंवा या प्रकरणाची स्वतः जबाबदारी घ्यावी.
- राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT