corona.jpg 
पुणे

रिपोर्ट आला निगेटिव्ह अन्‌ आठ दिवसांनी फोन येतो, तुम्ही पॉझिटिव्ह 

सकाळवृत्तसेवा

पुणे : गुलटेकडी येथील ओसवाल कुटुंब. कुटुंबातील सर्व सदस्यांनी 17 ऑगस्टला महापालिकेच्या बिबवेवाडी येथील कोविड केअर सेंटरवर कोरोनाची तपासणी केली. 19 ऑगस्टला सर्वजण निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट त्यांच्या हातात देण्यात आला. त्यामुळे सगळे आनंदात होते. परंतु अचानक आठ दिवसानंतर म्हणजे 25 ऑगस्टला त्याच केअर सेंटरवरून ओसवाल यांना फोन आला. तुमच्या दोन सुना आणि तीन नातवंडे पॉझिटिव्ह आली आहेत. ताबडतोब एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती व्हा... अन्‌ घरात घबराटीचे वातावरण पसरले. 

महापालिकेच्या कोविड केअर सेंटरवर कशा प्रकारे गोंधळ सुरू आहे, त्याचे हे उदाहरण. 19 ते 25 ऑगस्ट दरम्यान ओसवाल कुटुंबीयांनी कुठेही पुन्हा टेस्ट केलेली नाही. असे असतानाही निगेटिव्ह आलेला रिपोर्ट आठ दिवसात पॉझिटिव्ह कसा झाला, असा प्रश्‍न ओसवाल कुटुंबीयांना पडला आहे. त्याचे उत्तर अद्यापही त्यांना मिळाले नाही. एवढेच नव्हे, तर त्यांना एका खासगी हॉस्पिटलचे नाव घेऊन तेथे भरती व्हा, असा सल्लाही त्या कोविड केअर सेंटरवरून त्यांना दिला. एक नव्हे, तर तीन तीन अधिकाऱ्यांनी फोन करून ओसवाल कुटुंबीयांना पिच्छा पुरविला आहे. अखेर पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर कोविड केअर सेंटरमधील मधून फोन येणे बंद झाले, असे 67 वर्षीय चंदुलाल ओसवाल सांगत होते. 

चंदुलाल यांचा पत्नी, अजय आणि अभय अशी दोन मुले, दोन सुना आणि तीन नातवंडे असा परिवार आहे. 14 आगॅस्ट रोजी त्यांच्या अजय नावाच्या मुलाला त्रास होऊ लागल्याने बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अग्निशामक दल केंद्रावरील सेंटरवर तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांचा कोविड केअर सेंटरमध्ये क्‍यॉरंटाईन करण्यात आले. त्यानंतर 17 ऑगस्टला चंदुलाल आणि त्यांच्या कुटुंबीयांतील अन्य सदस्यांनी याच सेंटरवर तपासणी केली. त्या सर्वांचे टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आले. ते निगेटिव्ह असल्याचे सर्टिफिक्‍टेस त्यांना 19 ऑगस्ट रोजी देण्यात आले. असे असताना अचानक 25 ऑगस्टपासून त्यांना फोन सुरू झाले. तुमच्या दोन्ही सुना आणि नातवंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तेथून पुढे हा सर्व गोंधळ सुरू झाला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

क्वॉरंटाईन झाल्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह 
चंदुलाल यांच्या अभय या मुलाची तपासणी 19 ऑगस्ट करण्यात आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे सुरवातीला सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळाने पुन्हा फोन आला. अभयचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याला क्‍यॉरंटाईन करण्यात आले. आठ दिवसांनी त्याला घरी सोडण्यात आले. 25 ऑगस्ट महापालिकेकडून जो फोन आला. त्यामध्ये अभयचा रिपोर्ट निगेटिव्ह होता. चुकून तो पॉझिटिव्ह सांगितले. तुमच्या दोन सुना व तिन्ही नातवंडे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे नक्की काय खरे आणि काय खोटे असा प्रश्‍न त्यांच्या कुटुंबीयांपुढे पडला आहे. 

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून काय ती माहिती घेण्यात येईल.- डॉ. रूपाली भुतकर, वैद्यकीय अधिकारी, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Agriculture News : 'शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त'; कांदा उत्पादकांकडून थेट सरकारला जाब

Nandgaon Municipal Election : ४ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीला कंटाळले; नांदगावकर निवडणुकीच्या प्रतीक्षेत

Pachod News : संजय कोहकडे मृत्यू प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होणार

Latest Maharashtra News Updates : बावधन पोलिस चौकीसमोरची परिस्थिती

SCROLL FOR NEXT