Trekking
Trekking Sakal
पुणे

पर्यटनादरम्यान निष्काळजीपणामुळे पर्यटकांसोबत अपघात होण्याच्या घटना घडतात

अक्षता पवार

गड किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाण्याऱ्या पर्यटकांना हजारो फूट खोल दऱ्यांची माहिती नसते. त्यात निष्काळजीपणामुळे कित्येकवेळा पर्यटकांसोबत अपघात होण्याच्या घटना घडतात.

पुणे - सह्याद्रीतील गड किल्ल्यांवर (Fort) ट्रेकिंगला (Trekking) जाण्याऱ्या पर्यटकांना (Tourist) तेथील हजारो फूट खोल दऱ्यांची (Deep Valley) माहिती (Information) असतेच असे नाही. त्यामुळे पर्यटनादरम्यान निष्काळजीपणामुळे पर्यटकांसोबत अपघात (Accident) होण्याच्या घटना घडतात. काही खोल दऱ्यांमध्ये अडकतात, रस्ता चुकून जंगलात अडकतात, तर काहींना दुखापत होते. अशा पर्यटकांना ‘महाराष्ट्र पर्वतारोहण बचाव केंद्रा’ तर्फे (एमएमआरसीसी) जीवनदान मिळत आहे. दरम्यान गेल्या ५ वर्षांमध्ये एमएमआरसीसीने ट्रेकिंग दरम्यान दऱ्यांमध्ये अडकलेले, जंगलात रस्ता चुकलेले किंवा अपघातामुळे दुखापत झालेल्या ९०० हून अधिक पर्यटकांना सुखरूप वाचवले आहे.

गड किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाण्याऱ्या पर्यटकांना हजारो फूट खोल दऱ्यांची माहिती नसते. त्यात निष्काळजीपणामुळे कित्येकवेळा पर्यटकांसोबत अपघात होण्याच्या घटना घडतात. काही खोल दऱ्यांमध्ये अडकतात, रस्ता चुकून जंगलात अडकतात, तर काहींना दुखापत होते. अशा पर्यटकांना सुखरूप वाचविणे आव्हानात्मक आहे. साहसी पर्यटनाकडे कल वाढल्यामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ट्रेकिंग करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी प्रशिक्षण आणि साहसाची गरज असते. परंतु त्याहून अधिक जबाबदारी आणि कौशल्याचे कार्य म्हणजेच दऱ्या-खोऱ्यात अडकलेल्या किंवा दुखापत झालेल्या पर्यटकांना सुखरूप वाचविणे. त्यासाठी एमएमआरसीसी ही २४ तास मदतकार्य करण्यासाठी कार्यरत आहे.

मृत्यूचे प्रसंग टाळण्यासाठी ‘स्पीडी रेस्क्यू’चे प्रयत्न -

ट्केकर्स, छायाचित्रकार, निसर्गप्रेमी अशा प्रत्येक साहसवीरांसाठी महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांग आता ओळखीची बनली आहे. एमएमआरसीसीच्या माध्यमातून आपत्ती किंवा दुर्घटना घडलेल्या ठिकाणी त्वरित पोचण्यासाठी २४ तास हेल्पलाइन सेवा सुरू आहे. यामध्ये विविध संस्थेचे सदस्य व गिर्यारोहक हे स्वयंसेवक म्हणून घटनास्थळी मदत कार्यासाठी दाखल होतात.

एमएमआरसीसीचे उद्दिष्टे -

- घटनास्थळी त्वरित मदत पोचविण्यासाठी गिर्यारोहक, बचाव स्वयंसेवक, पोलिस स्टेशन आणि रुग्णवाहिका यांच्याशी संपर्क साधणे

- वेळेत प्रथमोपचार मिळावा यासाठी वैद्यकीय सुविधा तातडीने पोचविणे

- वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी बचाव, मदत आणि पुनर्वसन विषयावरील प्रशिक्षण देणे

‘गेल्या पंधरा दिवसांमध्ये राज्यातील गड किल्ल्यांवर, डोंगर दऱ्यांमध्ये पाच जणांनाचा मृत्यू झाला आहे. साहसी उपक्रमांच्या आयोजनमधील ढिसाळपणा, योग्य साधन सामग्री न वापरणे, आयोजकांचे अज्ञान, पूर्वतयारीचा अभाव, प्रथमोपचार साहित्य न बाळगणे आणि समाज माध्यमांमुळे वाढलेली क्रेझ यामुळे हौस-मौज म्हणून उपक्रमांमध्ये सहभाग अशा अनेक कारणांमुळे मानवी चुकांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे जीव गमावण्यापर्यंत परिणाम आज अनेकांना भोगावे लागत आहेत. यामुळे गिर्यारोहण सारखा साहसी क्रीडा प्रकार नाहक बदनाम होत आहे. त्यामुले आयोजकांबरोबर सहभाग होणाऱ्यांनी कोणत्याही साहसी उपक्रमात खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.’

- उमेश झिरपे, ज्येष्ठ गिर्यारोहक व अध्यक्ष-अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ

  • एमएमआरसीसी हेल्पलाईनवर गेल्या वर्षभरात आलेले कॉल - सुमारे २८०

  • एमएमआरसीसीशी संबंधित बचाव संघटनांची संख्या - ३० हून अधिक

  • आतापर्यंत वाचविलेल्यांची संख्या - ९०० हून अधिक

गेल्या पाच वर्षातील बचाव कार्य

वर्ष - वाचविलेल्यांची संख्या

२०१६ ते १७ - १४३

२०१७ ते १८ - १७६

२०१८ ते १९ - २६३

२०१९ ते २० - ३०० हून अधिक

२०२० ते २१ - २० हून अधिक

या संस्थांचा समावेश -

गिरिप्रेमी, निसर्गमित्र, निसर्ग प्रेमी, सह्याद्री मित्र, सह्याद्री ट्रेकिंग, यशवंती हायकर्स, वैनतेय गिर्यारोहण आणि गिरिभ्रमण क्लब, शिवदुर्ग मित्र ॲडव्हेंचर क्लब, ट्रेकक्षितिज, भोसला ॲडव्हेंचर फाउंडेशन, आदी.

या भागात सर्वाधिक बचाव कार्य -

सिंहगड, लोणावळा आणि खंडाळा, लोहगड, विसापूर, तिकोना, धाक बहिरी, मुळशी प्रदेश, ताम्हिणी घाट, देवकुंड धबधबा, महाबळेश्र्वर, हरिश्र्चंद्र गड, अंबोली घाट, तोरणा, चंदेरी, मानगड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शनिवारी खुला राहणार शेअर बाजार; NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग सत्र, जाणून घ्या तपशील

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Shahrukh Khan & Karan Johar : "शाहरुख आणि करण आहेत गे !" दाक्षिणात्य गायिकेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT