येरवडा ः डॉन बॉस्को स्कूलच्या मैदानावर शनिवारपासून सुरू झालेल्या नेल्सन पॉल स्मृती बॉस्को करंडक फुटबॉल स्पर्धेत नॉईज बॉईज आणी मॅथ्युज एफसी संघ यांच्यात झालेल्या सामन्यातील एक क्षण.
-----------------
नॉईज बॉईज, फाल्कन एफसी, जायंट्स एफसी संघांंची विजया सलामी बॉस्को करंडक फुटबॉल
पुणे, ता. ७ ः येरवडा युनिटचे सेलेझियन को-ऑपरेटर्स, ‘सॅक्रिड हार्ड पॅरिश’ आणि येरवड्याच्या डॉन बॉस्को एज्युकेशनल कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेल्सन पॉल स्मृती ‘बॉस्को करंडक’ फुटबॉल स्पर्धेत नॉईज बॉईज, फाल्कन एफसी आणि जायंट्स एफसी या संघांनी
विजया सलामी दिली.
येरवडा येथील डॉन बॉस्को स्कूलच्या मैदानावर शनिवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत नॉईज बॉईजने मॅथ्युज एफसी संघाचा टायब्रेकमध्ये ४-३ अशा गोलने पराभव केला. नॉईज संघाच्या आदित्य गंगेने ३६व्या मिनिटास गोल करून आघाडी मिळविल्यानंतर मॅथ्युज एफसीच्या गोपाल भंडारीने ५९व्या मिनिटास गोल करून बरोबरी साधली. नियोजित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटल्याने घेण्यात आलेल्या टायब्रेकमध्ये
नॉईज बॉईजच्या अक्षय दगडे, आशुतोष यादव, उत्कर्ष आमलुने गोल केले तर मॅथ्युज एफसीकडून गोपाल भंडारी आणि राणा पवारने गोल केले.
दुसऱ्या सामन्यात फाल्कन एफसीने सनी डेज संघाचा ३-० असा पराभव केला त्यात प्रमुख वाटा दोन गोल करणाऱ्या नईम सय्यदचा (१७ व ५७ वे मिनीट) होता त्याला आकाश थापाने खेळाच्या पाचव्याच मिनिटाला गोल करून सुरेख साथ दिली होती.
तिसऱ्या सामन्यात जायंट्स एफसी संघाने महाराष्ट्र युनायटेड फुटबॉल अकादमीवर ३-० अशा गोलने विजय मिळविला. या सामन्यात विजयी संघाकडून राधेय नाहक (१० वे मिनीट), कुशल भंडारी (२२ वे मिनीट) व अभय साळवीने (५९ वे मिनीट) गॅब्रियल डिकोस्टा, सार्थ कांबळेने दिलेल्या पासवर प्रत्येकी एक गोल केला.
या स्पर्धेचे उद्घाटन पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी फादर ख्रीसपीनो डिसुझा, सामाजिक कार्यकर्ते ग्रेगडी डिकोना, रॉबिन पॉल, जॉन पॉल, विल्सन चंडेवाल, स्पर्धा संचालक सिरिल असिरवदम, पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव प्यारेलाल चौधरी, उपाध्यक्ष प्रदीप परदेशी, सदस्य मॅथ्यु सुसेनाथन हे उपस्थित होते.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.