Neo Metro project esakal
पुणे

Neo Metro : निओ मेट्रोचा प्रस्तावावर तूर्त बाजूला ठेवण्याचा निर्णय

पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यात प्रस्तावित केलेल्या ‘उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गावर’ (एचसीएमटीआर) महामेट्रोने निओ मेट्रो प्रस्तावित केली आहे.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - महापालिकेच्या विकास आराखड्यात प्रस्तावित केलेल्या ‘उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गावर’ (एचसीएमटीआर) महामेट्रोने निओ मेट्रो प्रस्तावित केली आहे. मात्र, निओ मेट्रोच्या तंत्रज्ञानाची भारतात चाचपणी झालेली नाही. नाशिक येथील प्रस्तावास केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे.

त्यामुळे पुण्यातील निओ मेट्रोचा प्रस्तावावर तूर्त बाजूला ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वॉर रूमच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

महामेट्रोने शहरातील मेट्रोचा विस्तार करण्यासाठी खडकवासला-खराडी, पौड फाटा-माणिकबाग, वनाज-चांदणी चौक आणि रामवाडी-वाघोली या मार्गांचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करून तो महापालिकेला सादर केला आहे. त्याचसोबत ‘एचसीएमटीआर’च्या मार्गावर ४९४० कोटी रुपये खर्चाची  ४३.८४ किलोमीटर लांबीची वर्तुळाकार निओ मेट्रो प्रस्तावित केली आहे.

महापालिकेने डीपीआरमधील काही गोष्टींवर आक्षेप घेत त्यात बदल करण्याच्या सूचना महामेट्रोला केल्या आहेत. त्यासाठी वर्षभरापासून बैठका सुरु आहेत. दरम्यान हा प्रकल्प चर्चेच्या फेऱ्यांमध्ये आणि तंत्रज्ञानाच्या साशंकतेमुळे रखडला असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने नुकतेच दिले होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीत पुण्यातील मेट्रो, निओ मेट्रो यावर चर्चा झाली. रबरी चाकांवर व विजेवर धावणारी निओ मेट्रो सारखा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रकल्प भारतात कुठेही नाही. नाशिक येथे निओ मेट्रोचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे आहे.

पण निओ मेट्रोचे धोरण अद्याप केंद्राने स्वीकारलेले नाही. त्यामुळे त्यासही मान्यता नाही. केंद्र सरकारने नाशिकचा निर्णय घेतल्यानंतरच पुण्यातील निओ मेट्रोबाबत विचार करावा अशी सूचना या बैठकीत करण्यात आली आहे, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

डिसेंबरपर्यंत मेट्रोला १५० कोटी देणार

शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी महापालिकेच्या हिश्‍श्‍याचे १९० कोटी रुपये देणे होते. त्यापैकी ४० कोटी रुपये दिले असून, १५० रुपये देणे बाकी आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा झाली. महापालिकेने डिसेंबर अखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने हे पैसे दिले जातील असे सांगितले आहे.

तसेच कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉप चौकातील उड्डाणपुलाचा खर्च वाढला, त्यामुळे या वाढीव खर्चाचे १७ कोटी  देखील महामेट्रोला दिले जाणार आहेत, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

SCROLL FOR NEXT