काठमांडू, ता. १४ (पीटीआय) : नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला स्याफ्रुबेसी-रसुवागढी मार्ग पुन्हा उभारण्यासाठी नेपाळने चीनकडे मदत मागितली आहे. हा मार्ग चीनच्या सीमेला जोडणारा आणि दोन्ही देशांमधील व्यापारासाठी महत्त्वाचा आहे.
स्याफ्रुबेसीला रसुवागढीशी जोडणारा सुमारे १६ किलोमीटरचा रस्ता ६.५ अब्ज नेपाळी रुपयांच्या चिनी अर्थसाहाय्याच्या प्रकल्पांतर्गत विकसित केला जात होता. मात्र, पुराच्या तडाख्यात या रस्त्याचा मोठा भाग वाहून गेल्याने दोन्ही देशांमधील महत्त्वाचा व्यापारी मार्ग खंडित झाला आहे, असे ‘काठमांडू पोस्ट’ने म्हटले आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, रसुवागढी ते गल्छीदरम्यानच्या खराब झालेल्या मार्गाच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे ५५ अब्ज नेपाळी रुपये (सुमारे ३६४ दशलक्ष डॉलर) खर्च अपेक्षित आहे. ‘‘चीनने या रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी मदत करण्याची तोंडी हमी दिली आहे. मात्र, अद्याप लेखी करार झालेला नाही,” असे नेपाळचे पायाभूत सुविधा विकासमंत्री सुनील लम्साल यांनी शनिवारी सांगितले. ‘‘हा मार्ग केवळ नेपाळ आणि चीनमधील व्यापारी मार्ग नाही. या मार्गावर अनेक वसाहतीही आहेत,’’ असे लम्साल म्हणाले.
रसुवागढीपर्यंतचा मार्ग सुरू ठेवण्यासाठी सध्या तात्पुरता रस्ता तयार करण्याची तयारी सुरू आहे. दीर्घकालीन दृष्टीने अधिक सुरक्षित रस्ता उभारण्याची गरज असून, तोपर्यंत तात्पुरत्या मार्गाचा वापर केला जाईल, असे नेपाळच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. येथील सीमा चौकी पूर्ववत करण्यासाठीही नेपाळने चीनकडे प्रस्ताव पाठविला असून, विविध पर्यायांवर चर्चा सुरू असल्याचे लम्साल यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.