नेप्तीमधील विवाहितेची
गळफास घेऊन आत्महत्या
नगर तालुका ः नगर तालुक्यातील नेप्ती येथे एका विवाहित महिलेने राहत्या घरी भंगार दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २१ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. अमरकली संतराम निषाद (वय २५, रा. दरेकर हाऊस, नेप्ती) असे त्या महिलेचे नाव आहे. अमरकली निषाद हिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यावर तिचा पती संतराम निषाद याने खासगी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.