पुणे

''न्यूट्रल'' ड्रायव्हिंग जीवावर बेतणारे

CD

पळसदेव, ता. २२ : पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील तीव्र उतारांवर अवजड वाहन चालकांकडून इंधन बचतीसाठी वाहन न्युट्रल करण्याचा जीवघेणा प्रकार सर्रास सुरू आहे. यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडत असून, या प्रकाराला तातडीने आळा घालण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
इंदापूर हद्दीतील पाच ते सहा ठिकाणी असलेल्या तीव्र उतारांवर ट्रक आणि ट्रेलरचालक इंजिन न्यूट्रल करतात. अशा स्थितीत इंजिन ब्रेक काम करत नसल्याने वाहनाचा वेग अनियंत्रित होतो. अचानक ब्रेक फेल होणे किंवा पुढील वाहनावर आदळण्याच्या घटना यामुळे वारंवार घडत आहेत. विशेषतः रात्री आणि पावसाळ्यात हा धोका अधिक गंभीर होतो.
वाहतूक तज्ज्ञांच्या मते, न्यूट्रल ड्रायव्हिंगमुळे आपत्कालीन स्थितीत चालकाकडे नियंत्रणाचे पर्याय उरत नाहीत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी ''नो न्यूट्रल ड्रायव्हिंग''चे फलक, रंबल स्ट्रिप्स आणि आपत्कालीन ब्रेकिंग झोन तयार करणे गरजेचे आहे. तसेच, महामार्ग पोलिसांनी अशा चालकांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मोबाईलचा वापरही ठरतोय घातक
प्रवासादरम्यान अवजड वाहन चालक मोबाईलवर व्हिडिओकॉल किंवा करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात मग्न असल्याचे दिसून येते. या दुर्लक्षामुळेही अपघातांचे प्रमाण वाढले असून, भ्रमणध्वनी वापरणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: बुमराह-अर्शदीप ऑन फायर! पॉवर-प्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला दिले ३ धक्के; पाहा Video

MLA Car Bomb Attack : आमदार शौकत मोल्ला यांच्या कारवर बॉम्ब हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ!

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

Talegaon Chakan Road: तळेगाव-चाकण मार्गावर युवक बनले ‘देवदूत’! तातडीच्या प्रयत्नांमुळे अपघात टळले, नेमकं काय घडलं!

Latest Marathi News Live Update : लाडकी बहिण योजना बंद होणार नाही- सुनेत्रा पवार

SCROLL FOR NEXT