पुणे

नेवासे तालुक्यात पाच वर्षात तेरा पोलीस निरीक्षक: कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच बदलीमुळे अवैध धंदे गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ

CD

नेवासेत पाच वर्षांत तेरा पोलिस निरीक्षक

बदलीमुळे अवैध धंदे गुन्हेगारीत वाढ

रवींद्र सरोदे, सकाळ वृत्तसेवा

कुकाणे, ता.२८: जिल्ह्यात अत्यंत संवेदनशील असणाऱ्या नेवासे तालुका पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांची अवघ्या आठ महिन्यांत बदली झाली. मागील पाच वर्षांत बारा निरीक्षक झाले. नव्याने रुजू झालेले सागर ढिकले तेरावे अधिकारी ठरले. नेवासे पोलिस ठाण्यात अधिकारी टिकत नसल्याने अवैध धंद्याबरोबरच गुन्हेगारीचा आलेख वाढतच चालला आहे.
जिल्ह्यात नेवासे पोलिस स्टेशनचा कारभार कायमच चर्चेत राहिला आहे. खून, दरोडे, गावठी कट्ट्यांची तस्करी, वाळू व लँडमाफियांचा धुमाकूळ. याचबरोबर पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या अवैध व्यावसायिकांबरोबर झालेल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप, तसेच नेवासे पोलिस निरीक्षकावरच खंडणीचा दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे पोलिस स्टेशन राज्यात चर्चेत आले होते. प्रत्येक वेळी पोलिस अधिकाऱ्यांच्या तक्रारी विधानसभा, विधानपरिषदेत उपस्थित होतात. अधिकाऱ्याची बदली होते. मात्र, तालुक्याच्या कायदा सुव्यवस्थेत सुधारणा होत नाही. दिवसेंदिवस तालुक्यात अवैध धंद्यांचे जाळे वाढत चालले आहे. तालुक्यात कोणता अवैध व्यवसाय बंद आहे, हे दाखवा बक्षीस मिळवा, अशी परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या अवैध व्यवसायामुळे गुन्हेगारीचे प्रमाण तालुक्यात वाढतच चालले आहे.

मागील काही वर्षांपासून पोलिस अधिकारी नव्याने हजर होतात. काही महिने तर हे अधिकारी सत्कार हारतुरे घेण्यातच आपला वेळ घालवतात. नेमके तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचे कोणते प्रश्न आहेत. मागील दरोडे, चोऱ्यांचा तपास लागत नाही. सर्व अवैध धंदे, तसेच सुरू राहतात. पोलिस व अवैध धंदे दलालांचे लागेबंधे, तसेच सुरू राहतात. पुन्हा एखादी घटना घडते. पोलिस अधिकाऱ्याची बदली होते, मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तसाच राहतो. त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेला पोलिस आपल्यासाठी नाहीत, अशी भावना निर्माण होत चालली आहे.

..................
खमक्या अधिकाऱ्याची गरज
तालुक्याला खमक्या अधिकाऱ्याची गरज आहे. नव्याने हजर झालेले पोलिस निरीक्षक सागर ढिकले यांच्याकडून सामान्य जनतेला खमका अधिकारी आल्याची अपेक्षा आहे. त्यांना आपल्या कामातून खमकी वृत्ती दाखवून द्यावी लागणार आहे. नाहीतर अधिकारी आले अधिकारी गेले अशी म्हणण्याची वेळ पुन्हा येऊ नये.
...................
मागील नऊ वर्षातील प्रभारी अधिकारी (२०१७ ते २०२६)
प्रवीणचंद लोखंडे, शरद गोर्डे, रणजित डेरे, अभिनव त्यागी, विजय ठाकूर, विजय करे, बाजीराव पोवार, विजय करे, शिवाजीराव डोईफोडे, धनंजय जाधव, महेश पाटील.
.................
जनता भयभीत
तालुक्यात खून, दरोडे, वाळूतस्करी, अवैध धंदे, लँड व लिकरमाफियांच्या दहशतीमुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसामान्य जनता भयभीत आहे. याला आळा घालण्याचे आव्हान नव्याने हजर झालेल्या पोलिस अधिकाऱ्याला पेलावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs BANW: करो वा मरो सामन्यात टीम इंडियाची कसोटी; T20 WC मध्ये बांगलादेशविरुद्ध उतरले मैदानात

पत्रकारांना धमक्या देऊ नका; हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा, आदित्य ठाकरेंचे संजय पाटलांना खुले आव्हान

Virat Kohli: विराट कोहलीच्या नावाची जादू! लॉन्च होताच One8 चे 1.5 लाख शूज विकले; 24 तासांत कोट्यवधींची कमाई

LPG LNG Ships: मोठा दिलासा! 'होर्मुज'मधून 'एवढी' जहाजं भारताकडे रवाना, 26 जहाजं अजूनही आहेत रांगेत

Kamali Serial TRP: 'कमळी'चा नंबर पहिला! स्टार प्रवाहच्या 'ठरलं तर मग'ला टाकलं मागे; काय आहे नवी रँकिंग?

SCROLL FOR NEXT