Pune Police Commissioner Office esakal
पुणे

Pune News : पुणे पोलिस आयुक्त कार्यालयाची नवीन इमारत उभारणार; बांधकामासाठी १९३ कोटींच्या निधीस मंजुरी

पुणे शहर पोलिस आयुक्त कार्यालयाची नवीन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहर पोलिस आयुक्त कार्यालयाची नवीन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाकडून १९३ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

पुणे महापालिकेत नवीन गावे समाविष्ट झाल्यामुळे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढ झाली आहे. शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीमध्ये जागा अपुरी पडत आहे. या संदर्भात पोलिस महासंचालक कार्यालयामार्फत पुणे पोलिस आयुक्त कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी २४३ कोटी रुपये इतक्या रकमेचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी राज्य सरकारकडे सादर केले होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाने तांत्रिक मान्यता दिली आहे. याबाबत राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पोलिस आयुक्त कार्यालयाच्या नव्या इमारतीसाठी १९३ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली.

या नव्या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे. नव्या इमारतीच्या बांधकामाचा नकाशास वास्तुशास्त्र तज्ज्ञांकडून मंजुरी घेतली जाईल. त्यानंतर निविदा मागवून आणि प्रत्यक्ष निधी उपलब्ध झाल्यानंतर बांधकाम सुरू करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup Schedule : प्रतीक्षा संपली! वन डे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; India vs Pakistan सामना कधी व केव्हा; जाणून घ्या टीम इंडियाचे टाईमटेबल

Crop Panchnama Maharashtra : दुष्काळी तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे करा; ग्रामसेवक, तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तीन दिवसाच्या सुट्ट्या रद्द

Dhananjay Munde : दुष्काळ प्रश्नी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले; पीएम किसान व नमो शेतकरी सन्मान चे दोन दोन हप्ते तातडीची मदत म्हणून वितरीत करण्याची मागणी

IND vs WI: प्रसिद्ध कृष्णानंतर वॉशिंग्टन सुंदरलाही मालिकेतून केलं OUT! चाहत्यांना धक्का, पण दुखापत नसताना का घेतला हा निर्णय?

विमान अपघात घडवून आणण्याचा कट आधीच शिजलेला? कोणाचा सहभाग? 'यूएई'ने दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT