coronacovid
coronacovid 
पुणे

पुण्यात नव्या निर्णयामुळे सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना व कुटुंबीयांना दिलासा 

ज्ञानेश सावंत - सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाची लक्षणे नसलेल्या, फार तर सौम्य लक्षणे असलेल्या आणि "होम आयसोलेट' झालेल्या रुग्णांना आता महापालिकेच्या "कोविड केअर सेंटर'मध्ये येऊन नोंदी करण्याची गरज उरलेली नाही. कारण, अशा रुग्णांना त्यांच्या खासगी डॉक्‍टरांकडून उपचाराचे पत्र घेऊन ते आरोग्य अधिकाऱ्यांना "व्हॉटसऍप'द्वारे पोचविता येणार आहे. त्यासाठी खासगी डॉक्‍टरांनाही विशेष परवानगी देण्यात आली आहे. या नव्या निर्णयामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. 

सध्या सुमारे साडेचार हजार कोरोना रुग्ण घरीच उपचार (होम आयसोलेशन) घेत आहेत. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आल्याचे चित्र आहे. परिणामी अत्यवस्थ रुग्णांनाही खासगी आणि महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कुठेच बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मृत्यूदरही वाढत असल्याचे आकडे आहेत. या पार्श्‍वभूमीवर लक्षणे नसलेल्यांसोबत काही प्रमाणात लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांसाठी तेही ज्यांच्या घरी पुरेशा सुविधा आहेत, त्यांना घरीच उपचार घेण्याची सुविधा आहे. त्यानुसार आजघडीला सुमारे 4 हजार 512 रुग्ण "होम आयसोलेट' आहेत. परंतु, या रुग्णांची माहिती एकत्रित करण्यासोबत त्यांच्यावरील उपचार जाणून घेण्यासाठी प्रत्येक रुग्णांची महापालिकेच्या "कोविड केअर सेंटर'मध्ये नोंद बंधनकारक आहे. त्यासाठी संबंधित रुग्णाला प्रत्यक्ष जाऊन नोंद करावी लागते. त्यामुळे नवी सुविधा दिली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, ""घरीच राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांना आपल्या डॉक्‍टरांकडून उपचार घेता येणार आहेत. मात्र, ते त्याची सविस्तर माहिती महापालिकेपर्यंत पोचेल याचीही काळजी घ्यावी. त्यामुळे उपचारांत अडचणी आल्यास त्या दूर करणे शक्‍य होणार आहे.'' 

14 हजार 772  -  पुण्यात उपचार सुरू असलेले रुग्ण 
4 हजार 512 -  घरीच उपचार घेत असलेले रुग्ण 

 
होम आयसोलेशनचे नियम 
घरी स्वतंत्र बेड रुम, किचन असावे 
स्वतंत्र केअर टेकर असावा 
वय 60 पेक्षा कमी 
अन्य आजार नसावेत 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Loksabha election : ''बारामतीमधील स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही 45 मिनिटं का बंद होते?'' निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: पुण्यात ठिकठिकाणी बोगस मतदान, नागरिकांना यादीत मिळेना नाव; मुंढव्यात ईव्हीएम बंद

IPL 2024 Playoff Scenarios : RCB अन् CSK या दोघांनाही मिळू शकते प्लेऑफची तिकिटे? डोके शांत ठेवून समजून घ्या समीकरण

Motorcycle Fire Blast: बुलेटला लागलेली आग विझवताना झाला स्फोट, १० जण होरपळले.. अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Income Tax: आयकर विभागाने करदात्यांच्या सोयीसाठी सुरू केले नवीन फीचर; आता 'हे' काम होणार एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT