Shirur_Bazar_Samiti 
पुणे

शिरूर बाजार समितीच्या उपसभापतीपदी कुणाची लागणार वर्णी?; 'या' चौघांची नावे चर्चेत!

सकाळ वृत्तसेवा

शिरूर (पुणे) : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीनंतर आता शुक्रवारी (ता. २४) नवीन उपसभापतीची निवड होत असून, या पदावर कुणाची वर्णी लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. वीजेंद्र गद्रे आणि विकास शिवले या संचालकांच्या नावाची सर्वाधिक चर्चा असून, बाजार समितीच्या कारभारात यापुढे 'विकास' साधला जाणार की 'विजय'ध्वज फडकणार याविषयी राजकीय पटलावर उत्कंठा वाढली आहे. 

शशिकांत दसगुडे यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्याने गेल्या महिन्यात शंकर जांभळकर यांची सभापतीपदावर बिनविरोध निवड झाली. त्यानंतर लगेचच उपसभापती विश्वास ढमढेरे यांनी राजीनामा दिल्याने त्या पदावर नवीन संचालकांची निवड करण्याचा विषय पुढे आला. शिरूर बाजार समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकहाती वर्चस्व असून, एकूण १८ पैकी १३ संचालक पक्षाकडे असल्याने या घडामोडीत विरोधकांचा विषय निकालात निघाला आहे.

भाजपच्या पॅनेलमधून निवडून आलेल्या विकास शिवले यांनी विधानसभा निवडणूकीपूर्वी़ तर छाया बेनके यांनी सभापती निवडीवेळी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ १५ म्हणजे एकतर्फी झाले आहे. यातील पाच संचालक हे आंबेगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या ३९ गावांतून निवडून आलेले असल्याने सभापती-उपसभापती निवडीत विभागीय समतोल साधण्याचा मुद्दा नेहमीच पुढे येतो.

दरम्यान, आमदार अॅड. अशोक पवार यांनी राजकीय कसब वापरत गतवेळी दोन्ही पदे शिरूर भागात ठेवताना शिरूरमधील शशिकांत दसगुडे आणि तळेगावचे विश्वास ढमढेरे यांना अनुक्रमे सभापती-उपसभापती पदावर संधी दिली होती. त्यामुळे, यावेळी दोन्ही पदे आंबेगाव विभागातून दिली जावीत, अशी मागणी पुढे येण्याचा राजकीय धोका ओळखून महिनाभरापूर्वी केवळ सभापतीपदाचा राजीनामा घेऊन त्यांनी ही विभागणी मोडीत काढली होती.

तत्पूर्वी, शंकर जांभळकर यांची सभापतीपदी वर्णी लागल्याने आणि आंबेगावला जोडलेल्या भागातून ते निवडून आलेले असल्याने आता उपसभापतीपदाची संधी शिरूर विभागातील संचालकाला मिळणार हे स्पष्ट आहे. सभापतीपदाचा विषय संपला असला़; तरी गतवेळच्या पॅटर्नप्रमाणे यावेळी दोन्ही पदे म्हणजे आता राहिलेले उपसभापतीपदही आंबेगावातून दिले जावे, अशी मागणी पुढे येऊ शकते. 

विधानसभा निवडणुकीत विकास शिवले आणि विजेंद्र गद्रे या दोघांनीही दखल पात्र काम केल्यामुळे त्या दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. सभापतीपदाची संधी हुकलेले धैर्यशील उर्फ आबाराजे मांढरे यांनाही नेतेमंडळींकडून आग्रह होत असला तरी पुढे सभापतीपद मिळविण्यासाठी 'धैर्य' राखून असलेल्या आबाराजेंनी नेत्यांच्या या विनंतीला नम्र नकार दिल्याचे समजते. अभ्यासू, शांत आणि संयमी प्रतिमा असलेल्या सतीश कोळपे यांच्या नावाचीही चर्चा असून, तडजोडीतून त्यांचे नाव पुढे येऊ शकते. आंबेगाव विभागाला हे पद द्यायचे ठरल्यास तृप्ती भरणे यांना संधी मिळू शकते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT