new education policy opportunity to create updated curriculum a g rao Sakal
पुणे

NEP : नवीन शैक्षणिक धोरणामुळे अद्ययावत अभ्यासक्रम निर्मितीची संधी; प्राचार्य ए. जी. राव

उच्च शिक्षणात कालबाह्य अभ्यासक्रमामुळे साचलेपणा आला आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे अद्ययावत अभ्यासक्रम निर्मितीची संधी निर्माण झाली आहे.

कृष्णकांत कोबल

हडपसर : उच्च शिक्षणात कालबाह्य अभ्यासक्रमामुळे साचलेपणा आला आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे अद्ययावत अभ्यासक्रम निर्मितीची संधी निर्माण झाली आहे. व्यापार आणि उद्योग क्षेत्राला लागणाऱ्या मनुष्यबळाचा विचार करून अभ्यासक्रम अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.

अद्ययावत ज्ञान मिळाले तरच विद्यार्थी वर्गात येतील अन्यथा ते खाजगी विद्यापिठात जातील, असे प्रतिपादन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महाराष्ट्र राज्य सुकाणू समिती सदस्य प्राचार्य ए. जी. राव यांनी केले.

येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत वाणिज्य विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने अध्यापकांसाठी "राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची दिशा व उपयोजना' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उप कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बीजभाषक म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महाराष्ट्र राज्य सुकाणू समिती सदस्य प्राचार्य ए. जी. राव बोलत होते.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार अ‍ॅड. मोहनराव देशमुख, प्राचार्य व विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, डॉ. रवी वैद्य, प्राचार्य डॉ. संजीव लाटे, प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे आदी यावेळी उपस्थित होते.

उपकुलगुरू डॉ. काळकर म्हणाले, "नवीन शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षणातून कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्मितीला चालना दिली जात आहे. राज्यातील मध्यम आणि लघु उद्योगांशी अभ्यासक्रम जोडून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.'

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीस विलंब होत असला तरी नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असल्याचे संस्थेचे खजिनदार अ‍ॅड. मोहनराव देशमुख यांनी सांगितले.

कार्यशाळेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठता डॉ. यशोधन मिटारे, डॉ. तनुजा देवी, डॉ. प्रशांत साठे, डॉ. एम. के. सानप, डॉ. के .एस. निकम, डॉ. एस. पी. डाकले यांनी मार्गदर्शन केले.

समारोपाच्या सत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महाराष्ट्र राज्य सुकाणू समिती सदस्य प्रा. डॉ. प्रशांत मगर म्हणाले, "नवीन शैक्षणिक धोरण यशस्वीपणे राबविण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढील पाच वर्षाचा शैक्षणिक व पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करून कार्यवाही करावी.' नवीन शैक्षणिक धोरणात अध्यापकांचा कार्यभार, शिक्षक भरती या विषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत १३० अध्यापकांनी सहभाग घेतला. डॉ. राणी शितोळे व डॉ. नरसिंग गिरी यांनी कर्यशाळेबाबत भावना व्यक्त केल्या. उपप्राचार्या डॉ. शुभांगी औटी, प्रा. डॉ. गंगाधर सातव, प्रा. नीता कांबळे, प्रा. विशाल झेंडे,

प्रा. प्रतिक कामठे, प्रा. नेहा साळुंखे, प्रा. अजिनाथ डोके, डॉ. विवेकानंद टाकळीकर, प्रा. गौरव शेलार, प्रीती पाटील, प्रा. मधुमंजिरी ओक, प्रा. ऋषिकेश मोरे, प्रा. गणेश औटे, प्रा. माहेश्वरी जाधव, तृप्ती पवार यांनी कार्यशाळेचे संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT