पुणे

साने गुरुजी वसाहतीत नवी शंभर घरे; स्थायी समितीच्या बैठकीत 18 कोटी रुपयांना मंजुरी 

सकाळवृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या साने गुरुजी वसाहतीतील मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक झालेल्या इमारती पाडून नव्या इमारती बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या वसाहतीत धोकादायक घरात राहणाऱ्या रहिवाशांना नवी घरे मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात या भागात नवी इमारत बांधून शंभर घरे उपलब्ध होणार आहेत. 

या भागातील नव्या इमारतीच्या कामासाठी 18 कोटी रुपये देण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला. प्रत्यक्ष बांधकाम करून लोकांना तातडीने घरे पुरविण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. महापालिकेतील चतुर्थी क्षेणी कर्मचाऱ्यांसाठी साने गुरुजी वसाहतीत 17 इमारती असून, त्यात 450 घरे आहेत. मात्र, गेल्या काही वर्षापासून 11 इमारतींची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात काही गळती होऊन घरे धोकादायक झाली आहे. त्यामुळे अनुचित घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर या इमारती पाडून त्याच जागी नवे घरे देण्याची रहिवाशांची मागणी आहे. मात्र, राजकीय हस्तक्षेप आणि बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या प्रयोगामुळे येथील घरांच्या पुनर्बांधणीची योजना रखडली आहे. गेल्या तीन वर्षात काही घरांच्या भिंतीचा भाग कोसळला, तेव्हापासून रहिवाशांनी नव्या घरांचा आग्रह धरला आणि आंदोलनाचाही पवित्रा घेतला. त्यासाठी स्थानिक नगरसेवक धीरज घाटे यांनी महापालिका आयुक्तांना पत्रही दिले. परंतु, त्यावर कार्यवाही होऊ शकली नव्हती. मात्र, त्यावर मार्ग काढत जुन्या इमारत न पाडता वसाहतीतील मोकळ्या जागेत इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी स्थायी समितीपुढे ठेवलेला प्रस्ताव मंजूर करीत 18 कोटी रुपये देऊन बांधकाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या भागातील रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नव्या योजनेला मंजुरी दिली आहे. त्यातून शंभर नवी घरे बांधली जाणार आहेत. ही घरे लवकर उभारली जातील, पावसाळ्यापूर्वी घरे बांधली जाणार आहेत. 
- धीरज घाटे, नगरसेवक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

Asian Games : स्क्वॅशमध्ये दोन सुवर्णपदकं हुकली! अनाहत-अभय यांना रौप्य, तर बॉक्सिंगमध्ये दोन मेडल्स पक्के

Electric Shock : वडाळी-जैतखेडा रस्त्यावरील दूध डेअरीत विजेचा धक्का; २७ वर्षीय अक्षय खिल्लारेचा मृत्यू, दोघे जखमी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

Pune Ganesh Visarjan live: पुण्यातील पारंपरिक विसर्जन मिरवणुकीला डिजिटल उत्सवाची जोड

SCROLL FOR NEXT