new IT jobs in smaller cities 22 new Software Technology Park of India  developed in small towns of country pune
new IT jobs in smaller cities 22 new Software Technology Park of India developed in small towns of country pune  sakal
पुणे

नव्या आयटी रोजगारांना छोट्या शहरांमध्ये ब्रेक!

सम्राट कदम

पुणे : जगभरात सध्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राचा बोलबाला असून, सर्वाधिक रोजगाराच्या संधी याच क्षेत्रात निर्माण होतात. म्हणूनच देशातील छोट्या शहरांमध्ये नवे २२ सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (एसटीपीआय) विकसित करण्यात येत आहे. मात्र, या नव्या यादीत महाराष्ट्रामध्ये एकही एसटीपीआय प्रस्तावित नाही. पर्यायाने राज्यातील छोट्या शहरांमधील आयटीतील रोजगारसंधी घटण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आयटी क्षेत्रामुळे पुण्यासह बंगळूर आणि हैदराबादसारख्या शहरांना नवी ओळख मिळाली आहे. आयटी क्षेत्रासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध आहे.

मात्र, तरीही पुणे, मुंबई आणि नागपूरसारखी मोजकी शहरे सोडता इतर शहरात आयटी आणि त्याच्याशी निगडित व्यावसांयाचा विकास झालेला नाही. पुण्यातील सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे कार्यकारी संचालक संतोष रासकर सांगतात, ‘‘मुंबई आणि बंगळूर या शहरांना जोडणाऱ्या कोल्हापूर व साताऱ्यासारख्या ठिकाणी चांगले आयटी हब विकसित होऊ शकते. राज्याच्या गरजेपेक्षा अधिक सॉफ्टवेअर अभियंते निर्माण होतात. तसेच, आयटी उद्योगांसाठी मोठ्या व्यवस्थांची गरज नाही. त्यामुळे राज्यातील कोणत्याही शहरात सहजपणे आयटी हब विकसित होऊ शकते.’’ इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आजवर देशात ६२ एसटीपीआय विकसित केले असून, त्यातील सहा एसटीपीआय महाराष्ट्रात आहे.

आयटीतील थेट परदेशी

  • गुंतवणूक (एफडीआय) (आकडे कोटींमध्ये)

  • (स्रोत : माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचे लोकसभेतील उत्तर)

महाराष्ट्रात पूरक वातावरण

  • गरजेपेक्षा जास्त आयटी अभियंते

  • आयटीशी निगडित शैक्षणिक संस्थांची संख्या सर्वाधिक

  • वीज, पाणी आणि दळणवळणासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध

  • टीयर २ आणि टीयर ३ शहरांची संख्या जास्त

महाराष्ट्रातील एसटीपीआय

पुणे, नवी मुंबई, औरंगाबाद, नागपूर,

कोल्हापूर, नाशिक

राज्यातील रोजगार

  • दरवर्षीची अभियंत्यांची गरज : २८,०००

  • निर्माण होणारे आयटी अभियंते : २,७५,०००

प्रस्तावित एसटीपीआय

कर्नाटक, हरियाना, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, केरळ : प्रत्येकी एक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT