पिंपरी, ता. १० : ‘‘केंद्र सरकार आणि एक जूनपासून राज्य सरकारनेदेखील नवीन चार कामगार कायदे लागू केले आहेत. ते कामगारांचे आर्थिक आणि सामाजिक शोषण करणारे आहेत,’’ असा आरोप करत ते कायमस्वरुपी रद्द करावेत. जुने परंपरागत कामगार कायदे लागू करावेत,’’ अशी मागणी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने केली आहे.
पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘आयटक’चे अनिल रोहम, ‘सीटू’चे गणेश दराडे, दिलीप पवार, राजेंद्र खराडे, शशिकांत धुमाळ, विजय जाधव, भारती घाग, यशवंत सुपेकर, शांताराम कदम तसेच इंटक, आयटक, सीआयटीयू, एआयसीसीटीयु, एचएमएस, एनटीयूआय, बीकेएसएम, टीयूसीआय, बीयूसीटीयू, एआयबीइए, बीइएफआय, एआयआयइए, श्रमिक एकता महासंघ, राज्य कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, स्वतंत्र फेडरेशन, योजना कर्मचारी, आशा, अंगणवाडी आणि घर कामगार संघटना, पीएमपी कामगार संघटना, एमएसईबी कामगार संघटना व इतर कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.