पुणे

साताऱ्याजवळ होणार 'न्यू महाबळेश्‍वर'; काय आहे खास? 

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाबळेश्‍वरशेजारी "न्यू महाबळेश्‍वर' वसविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) "विशेष नियोजन प्राधिकरणा'चा दर्जा राज्य सरकारने दिला आहे. महामंडळाने या कामासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने यासंदर्भातील अध्यादेश नुकताच जारी केला आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी, पाटण आणि सातारालगतच्या गावांतील जागेवर हे न्यू महाबळेश्‍वर वसविण्याची योजना आहे. हे शहर वसविताना पर्यावरणाला बाधा येऊ नये, यासाठी सात अटींवर महामंडळाला हे शहर वसविण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

महाबळेश्‍वर हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. पर्यटनवाढीसाठी आणखी वाव आहे. त्याला चालना देण्यासाठी न्यू महाबळेश्‍वर वसविण्यात येणार असून, त्यामध्ये पायाभूत सुविधांवर भर देणार आहे. परंतु, हा भर देताना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदींचा विचार करून न्यू महाबळेश्‍वरमध्ये बांधकामांना परवानगी दिली जाणार आहे. न्यू महाबळेश्‍वरचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जाहिरात देऊन सल्लागार नेमण्यात येणार आहे, असे "एमएसआरडीसी'चे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

पर्यावरणाला धोका न पोचता विकास 
नैसर्गिक सौंदर्य जपूनच या नवीन शहराची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच, पर्यटनाला अधिकाधिक चालना कशी मिळेल, याचीदेखील काळजी घेतली जाणार आहे. त्या परिसरातील वन्यजीव, कास पठार आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या इतर स्थळांना कोणताही धोका पोचणार नाही, याची काळजी घेऊनच या शहराचे नियोजन करण्यात येणार आहे. 

असे असेल शहर 
एकूण क्षेत्र - 37 हजार 258 हेक्‍टर 
एकूण गावे - 52 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT