Sakal-Exclusive 
पुणे

स्पर्धा परीक्षांसाठी नवा ‘मुळशी पॅटर्न’

धोंडिबा कुंभार

पिरंगुट - आम्हीच आमच्या भविष्याचे शिल्पकार असून, एकमेकांच्या सहकार्यामुळेच आम्ही आमच्या यशाचा मार्ग सुकर करू, या जाणिवेने पिरंगुट (ता. मुळशी) येथील तुळजाभवानी टेकडीवर तरुणाईचे हात राबत आहेत. सरकारी नोकरी मिळवायची आणि मुळशीचा नवा पॅटर्न तयार करायचा, या एकाच ध्येयाने प्रेरित झालेल्या या तरुणाईने कामाला सुरुवात केली आहे. तेही ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ हे ब्रीदवाक्‍य समोर ठेवून.

पिरंगुट येथील तुळजाभवानी ट्रस्टच्या सहकार्याने येथील टेकडीवरील शक्तीचे प्रतीक असलेल्या देवीच्या मंदिरालगतच मोफत पोलिस भरती मार्गदर्शन केंद्र आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू झालेले आहे. युवकांनीच युवकांसाठी लोकसहभागातून सुरू केलेल्या या केंद्रात सध्या पन्नासहून अधिक युवक-युवती मार्गदर्शन घेत आहेत. त्यात पोलिस, महसूल, कृषी, सहकार तर कुणाला सैनिकी क्षेत्रातही जाऊन सामाजिक बांधिलकी जोपासायची आहे. या केंद्रांमध्ये प्रशासन सेवेत जाण्यासाठीचे मार्गदर्शन केले जाते. त्यातूनच प्रियांका मदने ही पुणे शहर, प्रशांत निंबाळकर हा मुंबई शहर पोलिसांत रुजू झालेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अजय काळे हा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामध्ये रुजू झाला. शुभम धनवे या तरुणालाही नोकरी मिळाली. संतोष भूमकर हा तरुण पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असून तन मन धनाने या केंद्रासाठी सहकार्य करीत आहे.  हॉल उभारणीसाठी मदतीचा ओघ सुरू असूनही केंद्रातील प्रत्येक तरुण-तरुणी स्वतः श्रमदान करत आहेत. शुभम धनवे व प्रियंका मदने म्हणाले की, आम्हाला २०२३ पर्यंत पीएसआय होण्यासाठी या अभ्यासिकेचा फायदा होणार असल्याने श्रमदान करीत आहोत. 

असा आहे उपक्रम

  • या केंद्राला ‘आदिशक्ती प्रेरणा केंद्र’ नाव दिले आहे
  • याच केंद्रातून मार्गदर्शन घेऊन पोलिस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये निवड झालेल्या दोघांकडून मोफत मार्गदर्शन
  • एकत्र येऊन मैदान तयार करण्याचे काम
  • ट्रस्टच्या माध्यमातून पंधराशे चौरस फुटांचे बांधकाम करून अभ्यासिकेसाठी हॉल उभारण्यात येत आहे
  • सध्या या केंद्रात पंधरा मुली व पस्तीस मुले सराव करतात
  • अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची पुस्तके व व्याख्यानांची व्यवस्था,  ऑनलाइन मार्गदर्शन सुविधा उपलब्ध होणार आहे

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT