Untitled-5.jpg 
पुणे

नवे महापालिका आयुक्त 'बीआरटी'बाबत म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा

पुणे ः शहरात गेल्या दहा वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या बीआरटी प्रकल्पाचा फेरविचार करण्याचा निर्णय नवनियुक्त महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी अर्थसंकल्प सादर करताना सोमवारी जाहीर केला. बीआरटीमुळे वाहतूक कोंडी सुटलेली नाही, असा धक्कादायक दावा त्यांनी केला. तर, दुचाकी वाहनांना बीआरटी मार्गातून प्रवेश देण्याबाबतही त्यांनी सूतोवाच केले. तसेच आठ दिवसांत बीआरटीबाबत निर्णय जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले.

शहरात बीआरटी प्रकल्पाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. स्वारगेट-कात्रज, हडपसर-स्वारगेट, विश्रांतवाडी- महापालिका भवन, नगर रस्ता आदी ठिकाणी बीआरटी प्रकल्प कार्यान्वित झाला होता. यातील काही मार्गांच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारमार्फत महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. तर, पीएमपीनेही उजव्या बाजूला दरवाजे असलेल्या बस बीआरटी मार्गांसाठी खरेदी केल्या आहेत. मात्र, अर्थसंकल्पाचे सादरीकरण करताना, ठरवून आल्याप्रमाणे आयुक्त गायकवाड यांनी बीआरटी योजना आता कुचकामी ठरत असल्याचे सूचित केले.

सातारा रस्त्यावर सध्या बीआरटी मार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे 100 कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू आहे. या पूर्वीचे आयुक्त कुणाल कुमार यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यात बीआरटी महत्त्वाची भूमिका बजावेल, असे सांगून सक्षम बीआरटीसाठी आटोकाट प्रयत्न केले होते. पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांनीही त्या भागात बीआरटीला प्राधान्य दिले होते. पुण्यात 100 किलोमीटरचे बीआरटीचे जाळे निर्माण करण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमधील बीआरटीही पुण्यातील बीआरटीला जोडण्यात आली आहे.

बीआरटीबाबत गायकवाड म्हणाले, ''बीआरटी मार्गातून सलग बस गेल्या तर, बरे. परंतू सध्या सलग बस जात नाहीत. सुमारे 80 टक्के वाहने दुचाकी आहेत. त्यांना तरी बीआरटीसाठीच्या जागेतून वाहतूक करता येईल का, या बाबत तज्ज्ञांशी सल्ला मसलत केली जाईल. बीआरटीबाबत पोलिसांचे मत विचारले असता त्यांनी "सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट' (सीआयआरटी) या संस्थेचा सल्ला घेऊ असे म्हटले आहे. त्यानुसार आम्ही पण त्या संस्थेचा सल्ला घेऊ. तसेच तज्ज्ञांशी चर्चा करून या बाबत निर्णय घेऊ.'' बीआरटी मार्गातून दुचाकी वाहनांना प्रवेश देता येईल का, यासाठी "टेक्‍निकल' सल्ला घेऊन निर्णय जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT