पुणे

हवेलीत संचारबंदीचा असा असेल नवा आदेश...

सकाळवृत्तसेवा

खडकवासला : हवेली तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या गावात पाचऐवजी तीन किलोमीटरचा कंटेन्मेंट झोन असेल तर कमी रुग्ण असलेल्या गावात मायक्रो कंटेन्मेंट झोन केले आहेत, अशी नवी सूचना प्रभारी उपविभागीय अधिकारी सुनील कोळी यांनी काढली आहे. 

येथे लॉकडाऊनच्या नियमानुसार 10 ते 2 या वेळेत दुकाने सुरू राहतील. त्या व्यतिरिक्त घराबाहेर पडण्यासाठी बंदी घातली आहे. तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींमध्ये हा नवीन आदेश लागू होणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खानापूर परिसरात 10 रुग्ण असल्याने या गावात तीन किलोमीटरचा बफर झोन असणार आहे. यामध्ये मणेरवाडी, गोऱ्हे खुर्द, घेरा सिंहगडाची, थोपटेवाडी, सांबरेवाडी या गावांचा यामध्ये समावेश आहे. तर उर्वरित 15 गावात रुग्ण संख्या कमी असल्याने त्या ठिकाणी पूर्ण गाव कंटेन्मेंट करण्याऐवजी, रुग्णाच्या घरापासून 500 मीटर, वॉर्ड, गल्ली, वाडी, वस्ती, किंवा गल्ली सोसायटी किंवा भौगोलिक परिस्थितीनुसार मायक्रो कंटेन्मेंट झोन केले आहेत. तसेच, गावात पाच रुग्ण होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत. परंतु सध्या त्यांना होम क्वारंटाईन रहावे लागणार आहे. म्हणून गावात पूर्ण कंटेन्मेंट झोन न करता संबधित रुग्ण राहत असलेली सोसायटी, गल्लीपुरते मायक्रो कंटेनमेंट झोन केले आहेत. उर्वरीत गावात मायक्रो कंटेन्मेंट झोन व्यतिरिक्त भागात लोकडाऊनची नियमावली थोडी शिथिल असेल, अशी माहिती गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली. 

मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये येणारे भाग 

*किरकटवाडीचा शिवनगर
(कोल्हेवाडीलगत),  
*खडकवासला- कोल्हेवाडी, 
*नांदेडचा जे.पी.नगर गोसावी वस्ती (किरकटवाडीच्या फाट्या समोरील भाग), 
*कोंढवे धावडे- ग्रीन कंट्री सोसायटी परिसर, 
*नऱ्हे- गोकुळनगर, 
*भिलारवाडी
*जांभूळवाडी-गावठाण, 
*मांजरी खुर्द गावातील गावठाण, झेड कॉर्नर व महादेवनगर असे तीन झोन करण्यात आले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

*कदमवाकवस्ती मधील कवडीमाळवाडी,
*लोणीकाळभोरचा गावठाण-विश्वराज हॉस्पिटल परिसर, 
*फुरसुंगीचा हांडेवाडी, पिसोळी- अंतुलेनगर, 
*कुंजीरवाडी थेऊरफाटा- गाढवेमळा, *उरुळीकांचन- आश्रमरोड, 
*पेरणे- लोणीकंद गावठाण
*वाघोलीचे केसनंद-जोगेश्वरी रोड- सदगुरुपार्क, गोऱ्हे वस्ती, फुलमळा, गाडेवस्ती, आव्हाळवाडी रोडवरील गणेशनगर पाच मायक्रो कंटेन्मेंट झोन केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT