ECHS Card Sakal
पुणे

‘ईसीएचएस कार्ड’ परताव्यासाठी नवे आदेश

माजी सैनिक अंशदायी आरोग्यसेवा योजना विभागाने (ईसीएचएस) ‘६४ केबी ईसीएचएस कार्ड’च्या सुरक्षित परताव्यासाठी नवे आदेश दिले.

सकाळ वृत्तसेवा

माजी सैनिक अंशदायी आरोग्यसेवा योजना विभागाने (ईसीएचएस) ‘६४ केबी ईसीएचएस कार्ड’च्या सुरक्षित परताव्यासाठी नवे आदेश दिले.

पुणे - माजी सैनिक अंशदायी आरोग्यसेवा योजना विभागाने (ईसीएचएस) ‘६४ केबी ईसीएचएस कार्ड’च्या सुरक्षित परताव्यासाठी नवे आदेश दिले आहेत. लष्करातून निवृत्त होऊन पुन्हा सरकारी किंवा खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या माजी सैनिकांनी या योजनेतून बाहेर पडताना ‘ईसीएचएस कार्ड’ पुन्हा विभागाला देणे आवश्‍यक आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुरक्षित हस्तांतर प्रकियेनुसार (सेफ कस्टडी) हे कार्ड ‘ब्लॉक’ करण्याच्या सूचना विभागाने दिल्या आहेत.

कुणाला होतो फायदा

विभागाकडून माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबांसाठी विविध आरोग्य योजना राबविण्यात येतात. यासाठी काही वर्षांपासून लाभार्थ्यांना ईसीचएस कार्ड घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनेकदा माजी सैनिक निवृत्तीनंतर पुन्हा नोकरी करतात. अशावेळी त्यांना संबंधित शासकीय किंवा खासगी संस्थांकडून वैद्यकीय सुविधा घेता येतात. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी माजी सैनिकांना ईसीएचएस सेवा योजनेतून बाहेर पडावे लागते. ही सेवा बंद करताना त्यांनी कार्ड विभागाकडे हस्तांतर करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आता हे कार्ड इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतर (ब्लॉक) करण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, भविष्यात माजी सैनिकांना हे कार्ड पुन्हा अनब्लॉकही करता येतील. त्यासाठी देखील ऑनलाइन प्रक्रिया देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ - www.echs.gov.in

कार्ड हस्तांतर प्रक्रिया

  • ईसीएचएस पॉलिक्सिनिकच्‍या प्रादेशिक केंद्राला भेट देत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे

  • प्रादेशिक केंद्रामध्ये सुरक्षित हस्तांतर प्रक्रियेला चालना

  • कार्ड नंबर/सेवा क्रमांक पुरविणे आवश्‍यक व इतर माहिती तपासली जाणार

  • ईसीएचएस कार्ड ‘ब्लॉक’ केले जाणार

  • पोचपावतीचा वापर ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) म्हणून नव्या संस्थेत करता येणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT