पुणे

उंड्रीत साकारणार सुसज्ज उद्यान

CD

उंड्री, ता. १४ : पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या उंड्री परिसरातील नागरिकांच्या मागणीला यश आले असून, प्रशासनाकडून या भागात सुसज्ज उद्यान उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व्हे क्रमांक ४ आणि २१ मधील सुमारे दोन एकर जागेत हे उद्यान साकारले जाणार असून, महापालिकेच्या या सकारात्मक भूमिकेचे स्थानिक रहिवाशांनी स्वागत केले आहे.
उंड्री, पिसोळी, वडाचीवाडी, होळकरवाडी आणि हांडेवाडी या परिसरातील नागरिकांना व्यायामासाठी किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध नव्हती. शहराप्रमाणे मिळकत कर भरूनही सुविधा मिळत नसल्याची तक्रार नागरिक करत होते. सार्वजनिक उद्यान नसल्याने अनेक नागरिक मुख्य रस्त्यावर चालण्यासाठी जात असत. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर चालताना एका सेवानिवृत्त सैनिकाचा अपघाती मृत्यू झाला होता. या पार्श्‍वभूमीवर सुरक्षित उद्यानाची मागणी जोर धरत होती.
उन्हाळ्यात लहान मुलांना बागेत खेळण्यासाठी येथून आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हडपसर परिसरातील उद्यानात जावे लागत होते, परंतु आता उद्यान हाकेच्या अंतरावर होत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. प्रस्तावित उद्यानात वॉकिंग आणि जॉगिंग ट्रॅक, लॉन आणि वृक्षारोपण करण्याचे नियोजन आहे. यासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

सुरक्षित उद्यानासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या उद्यानातील प्रत्येक झाड सैनिकाच्या स्मृतीत वाढेल.
- सुनील अय्यर, सदस्य, वेल्फेअर डेव्हलपमेंट फाउंडेशन

आयुक्तांच्या भेटीत नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार सार्वजनिक सुविधेसाठी राखीव असलेल्या जागेचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला वित्तीय मान्यता मिळाली असून, प्रशासकीय मान्यतेनंतर निविदा प्रक्रिया राबवून कामाला प्रारंभ होईल.
- अशोक घोरपडे, उपायुक्त, उद्यान विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गोड बातमी! सोन्याचे भाव पुन्हा घसरले; आज 10 ग्रॅमचा भाव किती?

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल

Maharashtra TET Exam Cancelled : 'टीईटी'चे गोपनीय साहित्य ट्रकमधून पुण्याला पाठविले; उत्तरपत्रिका-स्वाक्षरी पटाचा समावेश, प्रश्नपत्रिका जिल्हा कस्टडीत सुरक्षित

Ram Shinde : विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार : राम शिंदे

SCROLL FOR NEXT