उंड्री, ता. १७ : महापालिकेतील समाविष्ट गावांमधील पहिले सार्वजनिक उद्यान उंड्रीमध्ये होत आहे. एकूण साडेतीन एकर जागेमध्ये साकारले जाणाऱ्या या उद्यानाच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात करण्यात आल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
या उद्यानामुळे वेगाने विकसित होत असलेल्या उंड्री परिसरातील नागरिकांना हिरवळ, विरंगुळा आणि मनोरंजनासाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. येथील महंमदवाडी-उंड्री रेसिडेंट्स वेल्फेअर डेव्हलपमेंट फाउंडेशनकडून मागील एक वर्षापासून सातत्याने सार्वजनिक उद्यानाची मागणी करण्यात येत होती. त्यावेळी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी उंड्री परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला होता. या बैठकीत उंड्री आणि महंमदवाडी परिसरातील सार्वजनिक सुविधा तसेच मोकळ्या जागांची गरज अधोरेखित करण्यात आली.
उद्यानाचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना चालण्यासाठी, व्यायामासाठी, विरंगुळ्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी तसेच विविध सामाजिक उपक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. या उद्यानाला‘सिंदूर स्मृती वाटिका’असे नाव देण्याचा प्रस्ताव नागरिक आणि फाउंडेशनच्या सदस्यांकडून मांडण्यात येत आहे.
उद्यानाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मैदान समतोल केल्यानंतर व्यायाम मार्ग करून उद्यान प्रवेशद्वार करणार आहोत. एका ठिकाणी उद्यानाच्या भिंतीमुळे रस्त्यावर ब्लाइंड स्पॉट होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी भिंतीचे योग्य नियोजन करणार आहोत.
- अशोक घोरपडे, उपायुक्त, उद्यान विभाग महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.