पुणे

महसूल कार्यालयांसाठी नव्‍या जागा?

CD

पिंपरी, ता. १ ः शहराची वाढती लोकसंख्या, महसूल कार्यालयाची दुरवस्‍था, अपुरी जागा तसेच, महसूलविषयक कामांसाठी नागरिकांना करावी मारावे लागणारे हेलपाटे लक्षात घेता मंडल अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी कार्यालयांसाठी नव्‍या ठिकाणी जागा उपलब्‍ध होणार आहे. वेगवेगळ्या चार ठिकाणी कार्यालयांसाठी प्रस्ताव महापालिकेकडे तहसील कार्यालयाकडून पाठविण्यात आला आहे. त्‍यामुळे नागरिकांचे कामे लवकर मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.
महापालिकेच्या मालकीच्या इमारतींमधील गाळे तसेच रिक्त जागा संबंधित कार्यालयांसाठी उपलब्ध करून देण्याबाबत अखेर पत्रव्‍यवहार सुरू झाला आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १५ सप्‍टेंबरला याबाबत बैठक झाली होती. जमिनीच्या अधिकार अभिलेखांची सद्यःस्थिती आणि महसूल व्यवस्थेशी संबंधित विविध बाबींवर या बैठकीत चर्चा करण्यात झाली.
पिंपरी-चिंचवडचे अपर तहसीलदार जयराज देशमुख यांच्या कार्यालयाकडून बोऱ्हाडेवाडी, डुडुळगाव, वडमुखवाडी आणि अन्य भागांतील महसूल कार्यालयांसाठी जागांची मागणी करण्यात आली आहे. ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, प्रस्तावित कार्यालयांसाठी जागा योग्य असल्यास ती उपलब्ध करून देण्याची पुढील प्रक्रिया महापालिका स्तरावर पूर्ण केली जाणार आहे.
महसूलविषयक कामांसाठी नागरिकांना चकरा माराव्‍या लागतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ग्रामीण भागातून शहरात समाविष्ट झालेल्या परिसरातील रहिवाशांना हेलपाटे मारावे लागत असल्‍याने ती सोईस्‍कर ठिकाणी व्‍हावी, अशी मागणी करण्‍यात आली होती.

इथे होणार कार्यालये
बोऱ्हाडेवाडी ः गट क्रमांक २२८ येथे विकसित झालेल्या इमारतीमधील व्‍यापार संकुलात, मोशी कर संकलन विभागाचे पहिल्‍या मजल्‍यावर
डुडुळगाव ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्‍या इमारतीमध्‍ये खोली क्रमांक १०१ व १०२ मध्‍ये
वडमुखवाडी ः येथील साई आंगण इमारतीमधील तळमजल्‍यावर
दापोडी ः सव्‍र्हे क्रमांक १२ मधील सिद्धी टॉवर्स, महापालिकेच्‍या गाळ्यांपैकी काही जागा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

वीर पहाडियाचा रोमँटिक अंदाज, आफिया सय्यदचं पदार्पण; ‘प्रेम कीटाणू’ ठरतोय तरुणाईचा सिनेमा?

SCROLL FOR NEXT