पुणे

पुण्यासाठी नवीन नियम आज होणार जाहीर 

सकाळवृत्तसेवा

पुणे  - कोरोनाचा रुग्ण सापडलेली केवळ बैठी घरे, इमारतीतील मजल्याचा ठराविक भाग हा सूक्ष्मबाधित क्षेत्र म्हणून आखणी केली जात आहे. त्यामुळे घरे आणि सोसायट्यांभोवतीच्या शंभर मीटरच्या भागात फारशी बंधने नसतील, असे महापालिका प्रशासनाकडून सोमवारी सांगण्यात आले. त्यामुळे लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात बहुतांशी भागातील व्यवहार सुरळीत होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, या टप्याची नियमावली मंगळवारी (ता.२) जाहीर करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यांत काही सवलती देऊन शहरासाठी नवे नियम जाहीर केले जाणार आहेत. विशेषत: सार्वजनिक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले वगळता नागरिकांना फिरण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरातील उद्याने सुरू होण्याची चिन्हे आहेत. तर, जुन्या बाधित क्षेत्रातील काही दुकाने उघडून व्यवहार पूर्ववत केले जाण्याचीही शक्‍यता आहे. त्याचवेळी एखादा परिसर बाधित किंवा सूक्ष्मबाधित क्षेत्र घोषित करण्यापेक्षा रुग्ण सापडलेली नेमकी जागा म्हणजे, घर किंवा त्या इमारतीचा मजल्याबाबत निर्बंध घालण्यात येणार आहेत. त्यानुसार नवे सूक्ष्मबाधित क्षेत्र निश्‍चित करण्यात आली आहेत. त्यावर पोलिसांशी चर्चा करून तेथील सेवा-सुविधांचे धोरण ठरविण्यात येणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

गायकवाड म्हणाले, ‘‘या टप्प्यांत नेमक्‍या कोणत्या सवलती देण्यात येऊ शकतात ? याचा आढावा घेण्यात आला आहे. त्यात रुग्ण असलेल्या आणि नसलेल्या भागांचा अभ्यास झाला असून, त्यानुसार नवे निर्णय घेण्यात येतील. त्याआधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली जाईल. त्यानंतर नवे नियम जाहीर करण्यात येतील.’’ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT