bamarati sakal
पुणे

...तर परिवर्तन अटळ - सुनंदा पवार

गावचा कारभारी ( सरपंच ) प्रशिक्षित आणि अनुभवी असला पाहिजे.

कल्याण पाचांगणे, माळेगाव

माळेगाव :  समाज हिताच्या दृष्टीने कोणतेही काम निष्ठापूर्वक केल्यास आणि त्या कामात लोकांचा सहभाग वाढविल्यास व्यक्तीचेच नव्हे तर सुंपुर्ण गावाचे सर्वाथाने परिवर्तन होते, असे मत ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या (Baramati) विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी व्यक्त केले. यशदा संस्थेअंतर्गत शारदानगर (ता. बारामती) येथे आज नवनिर्वाचित सरपंचांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमात सौ. पवार बोलत होत्या. यावेळी सत्र समन्वयक एस.डी. बिरासदार, आर.टी. दीघडे यशदा पुणे, प्रशिक्षण प्रमुख सचिन खलाटे,आनंद दरवेशी, असीम शेख यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, माळशिरस, पुणे जिल्ह्यातील दौंड, खेड, मुळशी तालुक्यातील अनेक सरपंच उपस्थित होते.  (new sarpanch training program sunanda pawar say Change inevitable)

दरम्यान, सौ. सुनंदा पवार म्हणाल्या, ``कोरोनाने  घातलेले थैमान आणि लोकांची झालेली वाताहत पाहता आपण लोकप्रतिनिधी म्हणून काय बदलती भूमिका घेतली पाहिजेत, अशा अनेक प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी गावचा कारभारी ( सरपंच ) प्रशिक्षित आणि अनुभवी असला पाहिजे. त्यासाठी खऱ्याअर्थाने यशदा सारख्या संस्थांच्या मार्फत दिले जात असलेले प्रशिक्षण खूप महत्वाचे ठरते. शासनाच्या ग्रामीण व सामाजिक विकासासाठी अनेक योजना आहेत,  मात्र आपण त्या योजना राबविण्यासाठी काहीसे कमी पडतो. त्याचा विपरित परिणाम गावच्या विकास प्रक्रियेवर होतो. त्यासाठी संबंधित योजना गावातील लोकप्रतिनिधींनी समजावून घेणे अतिशय महत्वाचे असते. या पुढील काळात प्रशिक्षित संरपंचांनी स्वच्छता, सांडवाण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, बचत गट, स्वयंरोजगार, वृक्षारोपण, पर्यावरण अशी अनेक कामे राबविण्यासाठी पुढे आले पाहिजे.``

   सरपंच म्हणून आपण स्वतःला सेवक समजावे. लोकांना विकासाच्या कामातून न्याय देण्याचा प्रयत्न करावा. कोरोनातून लोकांचे आर्थिक, कौटुंबिक नुकसान झाले आहे. या संकटातून सावरत असतानाच आता महापूराचे संकट आले आहे. यात सरपंच अथवा गावचा पालक म्हणून आपली भूमिका महत्त्वाची ठरते, अशापद्धतीची जाणिव सौ. पवार यांनी उपस्थितांना करून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

'आई कायम जिवंत राहावी म्हणून झाडं लावली' सयाजी शिंदे वृक्षलागवडीबद्दल म्हणाले, 'सरकारने जमीन हिरावली पण...'

Latest Marathi News Live Update : राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा - जयंत पाटील

Vaibhav Sooryavanshi च्या प्रभावाखाली झाकून जाण्यापेक्षा, यशस्वी जैस्वाल याला RR सोडण्याचा सल्ला; Mumbai Indians योग्य पर्याय...

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

SCROLL FOR NEXT