PNE26W18146
सोलापूर : ५४ मीटर मार्ग येथे नवीन एसटी बस थांब्याचे उद्घाटन करताना बाळासाहेब वाघमारे, मल्लिकार्जुन अंजुर्गी, संतोष जोशी आदी.
---
चौपन्न मीटर रस्त्यावर
नवीन एसटी थांबा सुरू
देगाव, बसवेश्वर नगरातील प्रवाशांची सोय
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १० : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक ते मरिआई चौक दरम्यानचा एसटी बस थांबा पूल पाडल्यामुळे बंद झाला आहे. त्यामुळे देगाव, बसवेश्वर नगर, दमाणी नगर व देशमुख पाटील वस्ती परिसरातील प्रवाशांचे हाल होत होते. याबाबत एकात्मता बहुउद्देशीय संस्थेने निवेदन दिल्यानंतर ५४ मीटर मार्गावर नवीन एसटी थांबा सुरू करण्यात आला आहे.
एकात्मता बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक सचिन शिराळकर यांनी सोलापूर विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांच्याकडे निवेदनाद्वारे ५४ मीटर रस्त्यावर नवीन थांब्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत येथे नवीन एसटी थांबा मंजूर करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन जीएम ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, एसटी स्थानक प्रमुख मल्लिकार्जुन अंजुर्गी आणि वाहतूक नियंत्रण अधिकारी संतोष जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
या नवीन सुविधेमुळे तिऱ्हे, हिरज, कामती, शिंगोली तसेच मिरज, सांगली आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
यावेळी बजरंग जाधव, सचिन हक्के, रसूल पठाण, दत्ता जाधव, विजय कंदलगावकर, दिगंबर सर्वगोड, विनायक धोत्रे, योगेश माने, विकी बनसोडे उपस्थित होते. एकात्मता बहुउद्देशीय संस्थेच्या पाठपुराव्याला यश आल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.