New trend of commenting on old Photos of friends al social media during lockdown 
पुणे

लॉकडाऊनमध्ये सोशल मिडियावर नवा ट्रेंड; फ्रेंन्डसच्या जुन्या फोटोवर कॉमेंट्स करण्यात तरुणाई बिझी

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊनमुळे घरात बोर होऊ नये म्हणून मनोरंजनाच्या नवनव्या युक्त्या शोधल्या जात आहेत. या सर्वांत सोशल माध्यमांचा सर्वाधीक वापर होताना दिसतोय. त्यामुळेच मित्रांनी फेसबुकवर अपलोड केलेल्या जुन्या फोटोंवर भन्नाट कमेंट करण्याचे उद्योग सध्या जोरात सुरू आहेत. त्याचबरोबर #उकरला फोटो केली कमेंट #जुने फोटो टोळी सारख्या #टॅगचा वापर पण ट्रेंड झाला आहे. इतकंच नाही तर या ट्रेंडवरील भन्नाट मीम्स सुद्धा वायरल होत आहेत.



घरच्यांनी ताईंसाठी पाहिला देखणा दिवा....
पण, ताई म्हणतात मला पाणी पुरीवालाच हवा...

ताजमहाल पेक्षाही फेमस तुझी अदा... 
पोरच काय इथं, म्हातारे पण फिदा.

वांग्याचा केला रस्सा, पापड केला फ्राय ।
तू भाव देणार नाही, कितीही करा ट्राय ..

"सकाळी उठले आणि नेहमी प्रमाणे सगळ्यात पाहिले मोबाईल हातात घेतला. फेसबुक सुरू केले आणि एका पाठोपाठ एक फेसबुक वॉलवर मित्रांचे जुने फोटो दिसायला लागले. पहिल्यांदा समजले नाही, मग त्यावर केलेल्या कमेंट्स वाचल्या. बघते तर काय, आशा एक नाही तर अनेक यमक जुळणाऱ्या ओळी टाकण्यात आल्या होत्या. हा लॉकडाऊन मधला मंरोंजनाचा नवीन प्रकार मला जाम आवडला. तर मी सुद्धा यात सहभागी झाले आणि उकरून काढले मैत्रिणींचे जुने फोटो आणि एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स टाकण्याची सुरुवात केली. बर यासाठी यमक जुळवत असताना आपण पण आठवले झालो की काय असे वाटू लागले." असे मत अमृता वाडेकर या तरुणीने व्यक्त केले. अमृता एका कन्सल्टन्सी कंपनीतील कर्मचारी असून, लॉकडाऊनमुळे सध्या ती घरीच आहे. त्यात सोशल मीडियावर चालणाऱ्या या ट्रेंडमुळे चांगला टाईमपास होत असल्याचं ती सांगते.

Coronavirus : पुणेकरांची घरपोच आरोग्य तपासणी; महापालिकेची मोहीम
लॉकडाऊनच्या काळात आता सोशल मीडिया सगळ्यांचाच मनोरंजनाचा मोठा साधन बनला आहे. अशात हा ट्रेंड फक्त फेसबुक पर्यंत मर्यादित नसून चक्क वॉट्सएप आणि इन्स्टाग्राम पर्यंत पोचला आहे. यामध्ये आपल्या मित्र मैत्रिणींचे फोटो स्टेटसला टाकून त्यांच्या बद्दल एक दोन ओळी लिहल्या जात आहेत. 

स्वयंपाक, धुणीभांडी करणाऱ्या महिलांसह 'यांना' मिळणार आर्थिक सहाय्य

"कॉलेजमध्ये असताना निदान गप्पा मारायला, टाईमपास करायला सगळे जण होते. मग या लॉकडाऊनमुळे तो ही संवाद आणि भेटी थांबल्या आहेत. मात्र स्वतःचे मनोरंजन तसेच जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी, फेसबुक आणि इंस्टाग्राम वरून त्यांचे आठ नऊ वर्षांचा जुन्या फोटोंवर कंमेंट टाकतोय. तसेच ते आमच्या वॉट्सऍप ग्रुपवर सुद्धा शेअर करतोय."
- प्रशांत पोपट शिंदे, विद्यार्थी

अबब ! एकाच वेळी १० पेटंट केले फाईल ; पुण्याच्या वैज्ञानिकाची कमाल
 सोशल मीडियाच्या माध्यमातून #स्टेहोम चा प्रसार
सध्या लॉकडाऊनमुळे घरी असलेले नागरिक मोठ्या प्रमाणात सोशल मिडयाचा वापर करत आहेत. याच माध्यमाचा वापर करत #स्टेहोम चा प्रसार केला जात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भावला रोखण्यासाठी घरी थांबणे केंव्हाही चांगलेच असा संदेश दिला जात आहे. यासाठी टिकटोक, हॅलो सारख्या माध्यमांवर व्हिडिओ पोस्ट केल्या जात आहेत.


फेसबुक वर असे करत आहेत कमेंट

1. तुम्हाला खाऊ घालतो lockdown नंतर नाष्टा...
बस करा आता गरीबाची चेष्टा....

2. कोरोनामूळे पुर्ण विश्वात सुरू झाली मंदी.
आम्हाला खायची आमच्या दादाच्या लग्नात बुंदी...!

3. कोरोनानंतर आला होता हंता,
भाऊंच्या फोटोवर फिदा अण्णांची शेवंता.


4. एक होत घर, घरात होती खुर्ची,
भाऊचा फोटो पाहून, प्रेमात पडली आर्ची.

5. आर्ची ताई म्हणाली, आर्ची ताई म्हणाली, #बाकीसगळेझिरो
#आतातुम्हीचहायमाझेहीरो 

6. कोरोनामुळे अख्खा भारत भंगला
भाऊंना पोरी बघून म्हणता तुझ्यात जीव रंगला.

7. पाण्याला इंग्लिशमध्ये म्हणतात #water
भाऊला कुणी नडला तर डायरेक्ट #matter

8. बागाला लागते ड्रिपची नळी
आमचा भाऊ एक गुलाबाची कळी.

9. जेवणानंतर दिला जातो मुखवास,
मुली करतात भाऊंसाठी कडक उपवास.

10. भाऊंच्या घरात मारबलची फरशी
सगळया पोरी म्हणता होणार सून मी ह्या घरची...

11.शिंपल्याचे शो पीस नको...जीव अडकला मोत्यात ..
हिच्या नादी... लागू नका.. ही मारते घालून पोत्यात...!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : पर्रिकर न सांगता फिरायचे तसे फिरा, पुण्यातील महिलेनं सल्ला देताच अजित पवार म्हणाले, कोण पर्रिकर? नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Heavy Rain: गेवराईत शनिवारी रात्री मुसळधार पाऊस; नदी नाल्यांचा पाणी ओसांडून अनेक गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे उत्पन्न धोक्यात

Kolhapur Crime : पहाटे चोरी करून रात्री थ्री स्टार हॉटेल मजा मारायची, लूटमारीचा चंगळवाद; CCTV मध्ये सापडताच पोलिसांनी केला कार्यक्रम

Mental Health: दर सात जणांपैकी एकाला मानसिक विकार; २०२१ मधील जगभरातील स्थिती, एक अब्ज जणांना त्रास, ‘डब्लूएचओ’ची माहिती

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

SCROLL FOR NEXT