New vendors entering in vegetable selling affected old vendors business 
पुणे

भाजी विक्रेत्यांवर आल 'हे' नवीन संकट

सकाळवृत्तसेवा

आंबेगाव (पुणे) :  लॉकडाऊन दरम्यान जेव्हा जवळपास सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते तेव्हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय नेमका तेजीत होता, याचाच फायदा घेत बहुतेक जणांनी आंबेगाव परिसरात ठिकठिकाणी नवीन भाजीपाला विक्रीची दुकाने मोठया प्रमाणावर थाटत आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला परंतू, आता हीच दुकाने पुढेही चालू ठेवण्याचा मानस बऱ्याच जणांचा आहे. नेमक ह्याच प्रकारामुळे आता भाजीविक्रेत्यांची संख्या ही मोठया प्रमाणावर वाढली आहे त्याचा फटका जुन्या भाजी विक्रेत्यांना झाल्याचे जुने भाजी विक्रेते सांगत आहेत.    

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'मोठया प्रमाणावर निर्माण झालेल्या नवीन भाजी विक्रेत्यांमुळे आम्हा जुन्या भाजी विक्रेत्यांचा धंदा मोठया प्रमाणावर घटला आहेच त्यातच सोसायटीच्या आवारातच थाटलेल्या भाजीपाल्याच्या दुकानातून ग्राहक माल खरेदी करत असल्याने कित्येकदा ग्राहक भाजी मंडईत पोहचत नसल्याची खंतही ते बोलून दाखवत आहे. काहींना तर दुकानाचे भाडे व इतर खर्चही भागवणे अवघड होत असल्याचे ते सांगत आहे  पण, त्याच बरोबर नवीन भाजी विक्रेत्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न, त्यांच्या आर्थिक समस्या देखील हे जुने भाजीविक्रेते मान्य करत आहे. तर, दुसरीकडे नवीन भाजी विक्रेते गेल्या काही महिन्यात आम्हाला जे हाल सहन करावे लागले ते पाहता सध्या तरी भाजी विक्री हा व्यवसाय हा आपल्यासाठी योग्य असल्याचे सांगत आहे .

काय सांगता! विमानाने पुण्यात येणाऱयांपेक्षा जाणाऱयांची संख्या वाढली, 'अशी' आहेत कारणे 

"माझ्या घरात मी, माझा भाऊ, माझी बहिण तीघेही कमावते होतो पण, लॉकडाऊन दरम्यान मी काम करत असलेले हॉटेल बंद झाले तर. भाऊ आणि बहिण यांचा पगार अजूनही अडकून पडला आहे. अश्या परिस्थितीत पोटापाण्याचा प्रश्न सोडावण्यासाठी दोन महिने झाले भाजी विक्री सुरू केली, दुसर करणार तरी काय? अतिक्रमण कारवाईची धास्तीही असतेच प्रशासनाने ह्या काळात थोडस सहकार्य करावे ही अपेक्षा आहे ".
- शेखर घाडगे, नवीन भाजी विक्रेता 

काम मिळत नव्हते, जवळ पैसे नाही, म्हणून कुटुंबाने मारली विहिरीत उडी; पण...

"आमचा पिढीजात भाजी विक्रीचा व्यवसाय आहे स्वतः मी गेली तीस वर्ष हा भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहे. सध्या नवीन मोठया प्रमाणावर निर्माण झालेल्या भाजी विक्रेत्यांमुळे आमचा व्यवसाय जळपास ५०% कमी झाला आहे. परिस्थिती थोडी अवघड होत आहे .पण नवीन भाजी विक्रेत्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाचीही आम्हाला जाणीव आहे" .
- राजेंद्र संसारे, जुने भाजी विक्रेते 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT