New Year Holidays google
पुणे

New Year Holiday : नव्या वर्षात महाविद्यालयांना ३१ शासकीय सुट्ट्या; विद्यापीठाच्या वतीने सुट्यांचे वेळापत्रक जाहीर

नवीन वर्षात अर्थात २०२४ मध्ये शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठाला ३१ शासकीय सुट्ट्या मिळणार आहे.

सम्राट कदम

पुणे - नवीन वर्षात अर्थात २०२४ मध्ये शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठाला ३१ शासकीय सुट्ट्या मिळणार आहे. रविवारची साप्ताहिक सुट्टीचा दिवस वगळता या सुट्ट्या असून, यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जन्मकल्याणक, भाऊबीजेच्या सुट्या रविवारी आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षातील सुट्यांचे आजच नियोजन करता येईल.

कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक दिवस साप्ताहिक सुट्टी मिळत असते. परंतु त्याचबरोबर काही सार्वजनिक आणि शासकीय सुट्ट्या देखील असतात. त्या दिवशी संबंधित कार्यालयाचे किंवा महाविद्यालयाचे कामकाज बंद असते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यालयाला रविवार बरोबरच महिन्याच्या पहिला आणि तिसऱ्या शनिवारी सुट्टी असते.

त्यामुळे त्या दिवशी विद्यापीठाचे कामकाज बंद राहणार आहे. या व्यतिरिक्त महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्यांबरोबरच दिवाळी दरम्यानही सुट्ट्या असतात. त्यामुळे पुढील वर्षी सर्वाधिक सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वर्ष २०२४ मधील शासकीय सुट्ट्यांचे परिपत्रक नुकतेच जाहीर केले आहे.

स्थानिक सुट्ट्या लागू -

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाला संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी जाहीर केलेल्या सुट्ट्या लागू होतील. तसेच महाविद्यालया किंवा संस्थेला जाहीर सुट्ट्यांपैकी काही सुट्ट्या देता येणे शक्य नसल्यास त्या बदल्यात सोयीनुसार पर्यायी सुटी देता येणार आहे.

१३ सुट्या जोडून -

साप्ताहिक रविवारच्या सुट्टीला जोडूनच सोमवार, शनिवार किंवा शुक्रवारी सुट्टी आल्यास ‘दीर्घ सुट्टी’चे नियोजन केले जाते. यंदा तब्बल १३ सुट्या अशा येणार असल्याने विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. या १३ पैकी चार सोमवारी, तीन शनिवारी आणि सहा शुक्रवारी आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT