RK-Padmanabhan 
पुणे

‘नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल पहाटे पाचपर्यंत’ - आर. के. पद्मनाभन

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ‘‘नववर्षाच्या स्वागतासाठी सरकारने पहाटे पाचपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याचा अध्यादेश काढला आहे. यामुळे सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल,’’ असे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी सांगितले.

रात्री दीडपर्यंत दारूची दुकाने आणि हॉटेलला परवानगी असते. मात्र, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दारू विक्रीच्या दुकानांना पहाटे दीडपर्यंत; तर परमीट रूम, बिअर बार आणि हॉटेलकरिता पहाटे पाचपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. आयुक्‍त पद्मनाभन म्हणाले, ‘‘सरकारने काढलेला अध्यादेश आमच्यापर्यंत अद्याप आलेला नाही. तरीही अशा प्रकारचा अध्यादेश असल्यास तो मिळवून त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.’’ यामुळे आता नववर्षाचा जल्लोष पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले. या दिवशी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्याचे आदेश पोलिस आयुक्‍तांनी यापूर्वीच दिले आहेत. पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गस्तही वाढविण्यात येणार आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणाऱ्या आणि दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिस कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike : दूध महागणार! १ सप्टेंबरपासून प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ; नवा दर किती?

Devdutta Padikkal Tattoo: बाबो! जर्सीचा नंबर अन् नाव थेट पाठीवर! पडिक्कलच्या टॅटू पाहून चाहतेही चक्रावले, म्हणाले, ‘ अरे हे काय!’

Animal Feed Poisoning: पशुखाद्यातून विषबाधा; गोणेवाडीत दोन जनावरे दगावली, दोन गंभीर; पशुपालकाला मोठा आर्थिक फटका

Marathi News Live Updates : रक्षाबंधनानिमित्त रामदास आठवलेंची कामाठीपुराला भेट; महिलांनी बांधली राखी

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात माणुसकीला लाज आणणारी घटना! मृत महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने चोरले; VIDEO VIRAL होताच संतापाची लाट

SCROLL FOR NEXT