नेवाशातील २३ जणांविरोधात गुन्हा
ऋषिकेश शेटे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
नेवासे शहर, ता. २८ ः भाजप जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्या वाहनाची तोडफोड करत त्यांच्यावर चाकू हल्ला केल्या प्रकरणी २३ जणांविरोधात नेवासे पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील फळविक्रेते अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईवरून निर्माण झालेल्या वादात गुरुवारी ऋषिकेश शेटे यांच्या कारला ६० ते ८० जणांच्या जमावाने घेराव घालत दगडफेक केल्याची घटना गणपती चौकात घडली. कारची काच फोडून फळ कापण्याच्या चाकूने गळा कापण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेटे यांनी फिर्यादीत केला. शहरातील मुख्य रस्त्यावरील फळविक्रेत्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी शेटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नगरपंचायतीकडे निवेदन दिले होते. यानंतर अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चाकू लागल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली.
याप्रकरणी फिर्यादीवरून पोलिसांनी असिफ पठाण, अब्बास बागवान, परवेज बागवान, अरबाज बागवान, सलमान ऊर्फ साहिल बागवान, अरबाज अफरोज बागवान, शोएब राजू बागवान, शाहरुख बागवान, फारुक बागवान, जुम्मा जहागीरदार, फरहान दाऊद बागवान, रिहान दाऊद बागवान, शाहरूख भाईसाब, मोसिम हणू बागवान, दाऊद बागवान, मोहसीन हनू बागवान, अज्जू मेहबूब बागवान, मोसिम अब्बास बागवान, मोहम्मद अब्बास बागवान, नवाब बागवान, शहीद शौकत बागवान, निसार अब्दुल बागवान, अरबाज बागवान यांच्यासह ६० ते ८० जणांच्या जमावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप वासवे करत आहेत. या घटने प्रकरणी १४ जणांना अटक केली. त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.