पुणे

सीनापात्रात नवजात अर्भकाचा मृतदेह

CD

सीनापात्रात नवजात अर्भकाचा मृतदेह

अहिल्यानगर, ता. ९ ः शहरातील आनंदनगर परिसरात सीना नदीच्या पात्रात नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेवक दत्ता गाडळकर यांनी शुक्रवारी कोतवाली पोलिसांना फोनद्वारे माहिती दिली की, आनंदनगर येथील विक्रांत जिम परिसराच्या आत सीना नदीच्या पात्रात एका नवजात बाळाचा मृतदेह तरंगत आहे. ही माहिती मिळताच कोतवाली पोलिस ठाण्यातील महिला सहायक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात, पोलिस अंमलदार अमोल गाडे, अतुल काजळे हे तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, सीना नदीपात्रात अंदाजे आठ दिवसांचे नवजात अर्भक पाण्यात तरंगताना आढळून आले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर महानगरपालिका, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, तसेच फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळ पंचनामा केला. त्यानंतर संबंधित नवजात अर्भकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. नायब तहसीलदार व पंचांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या इनक्वेस्ट पंचनाम्यात संबंधित अर्भक हे पुरुष जातीचे असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने शवविच्छेदनासाठी तो जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. नवजात अर्भकाचा मृतदेह गुप्तपणे नदीपात्रात फेकून अपत्य जन्माची माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस अंमलदार अमोल गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ठाकरे बंधू एकटवले! ४ ऑक्टोबरला 'जनमोर्चा'ची घोषणा; नेमका मुद्दा काय?

Virat Kohli Retirement: २०२७ चा वर्ल्ड कप हा माझा भारतासाठी शेवटचा...; विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत, रोहित शर्माही म्हणाला की...

Amazon Great Indian Festival sale 2026: स्मार्टफोन्सवर ऑफरचा पाऊस; मिळणार भरघोस डिस्काउंट! पाहा कोणत्या फोनची किंमत किती?

Incognito मध्ये सर्च केल्यावर हिस्ट्री दिसत नाही; पण ‘या’ लोकांना तुमची माहिती कळू शकते

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

SCROLL FOR NEXT